Turmeric Milk Benefits : हळद ही आयुर्वेदातील एक अमूल्य औषधी आहे. तिचा उपयोग हजारो वर्षांपासून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी होत आला आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे शक्तिशाली घटक असल्याने काही आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.
हळदीचे दूध नियमितपणे प्यायल्याने शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सामान्य सर्दी, ताप, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते.
27
सांधेदुखी आणि सूज यावर आराम
हळदीतील कर्क्युमिन सूज कमी करण्याचे गुणधर्म असलेले आहे. त्यामुळे सांधेदुखी, स्नायूंचा ताण किंवा आर्थरायटीससारख्या त्रासांमध्ये हळदीचे दूध उपयुक्त ठरते.
37
चांगल्या झोपेसाठी फायदेशीर
रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध प्यायल्यास मेंदूला शांतता मिळते व झोप चांगली लागते. तसेच तणाव व मानसिक थकवा कमी होतो.