Published : Apr 17, 2025, 09:38 AM ISTUpdated : Apr 17, 2025, 11:08 AM IST
Switch Board Cleaning Tips : घरात असलेले स्विच बोर्ड कालांतराने काळे पडू लागतात. खरंतर, स्विच बोर्डवर लागलेली धुळ, माती आणि घाण यामुळे काळे पडतात. हेच काळेकुट्ट झालेले स्विच बोर्ड स्वच्छ कसे करायचे यासाठी खास टिप्स जाणून घेऊया.
घराची साफसफाई करताना, आपण फरशी, दरवाजे, खिडक्या, पडदे आणि फर्निचर स्वच्छ करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. परंतु एक गोष्ट जी अनेकदा आपल्या नजरेतून सुटते ती म्हणजे इलेक्ट्रिकल स्विचबोर्ड. हे तेच स्विचबोर्ड आहेत ज्यांना आपण दिवसातून कितीतरी वेळा स्पर्श करतो पण त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही.
26
टिप्स आणि ट्रिक
घरातील स्विच बोर्ड काळे पडले असल्यास किंवा खराब झाले असतील तर स्वच्छ करण्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक फॉलो करू शकतो हे पुढे जाणून घेऊया.
36
वीज खंडित करा
साफसफाई करण्यापूर्वी मुख्य वीज खंडित करा.यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका कमी होईल. याशिवायसाफसफाई करताना हातात रबरी हातमोजे घाला आणि पायात चप्पल घाला. स्वच्छतेसाठी मऊ ब्रश, कापूस, सुती कापड आणि घरगुती वस्तू तयार ठेवा.
इलेक्ट्रिक स्विच स्वच्छ करण्यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. या लिक्विडमध्ये कापूस किंवा टूथब्रश भिजवू स्विचबोर्डवर घासून घ्या. यामुळे स्विच बोर्डवर साचलेली धूळ आणि ग्रीस स्वच्छ होण्यास मदत होईल.
56
बेकिंग सोडा आणि पाणी
इलेक्ट्रिक स्विच स्वच्छ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा घेऊन पाण्यात मिक्स करुन जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट टूथब्रशच्या मदतीने स्विचबोर्डवर लावा. पेस्ट काही मिनिटांनी कोरड्या कापडाने पुसून टाका. यामुळे डाग निघून जातील आणि स्विचबोर्ड स्वच्छ होईल.
66
टुथपेस्टचा वापर
घरातील इलेक्ट्रिकल स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी टूथब्रशवर पांढऱ्या रंगातील टूथपेस्ट लावून स्विचबोर्ड स्वच्छ करा. नंतर ओल्या कापडाने टुथपेस्ट पुसून टाका.