जगभरातील वेगवेगळ्या देशात सूर्यग्रहण दिसणार आहे. मात्र सूर्यग्रहण दिसण्याची वेळ वेगवेगळी असणार आहे. एखाद्या देशात तासभरासाठीच सूर्यग्रहण असेल तर दुसऱ्या देशात दोन तासांसाठी असू शकते. काही देशांमध्ये पूर्ण सूर्यग्रहण काही मिनिटांसाठीही असू शकते. मुख्यत्वे पूर्ण सूर्यग्रहण कॅनडा, अमेरिका, मॅक्सिको, जमाइका, नॉर्वे, पनामा यासारख्या देशात दिसणार आहे.