यंदा हनुमान जयंती 23 की 24 एप्रिल? जाणून घ्या योग्य तारीख
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा हनुमान जयंती एप्रिल 2024 च्या महिन्यात साजरी केली जाणार आहे.
पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी 22 एप्रिल सोमवारी रात्री 3.26 वाजता सुरू होणार असून 25 एप्रिलला पहाटे 5.18 मिनिटांपर्यंत असणार आहे.
विद्वानांनुसार, चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीचा सूर्योदय 23 एप्रिल, मंगळवारी होणार आहे. याच दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.
ग्रंथांनुसार, चैत्र महिन्यातील पौर्णिमेला भगवान शंकरांनी हनुमानाचे रूप घेतले होते. यामुळे प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या तिथीला हनुमान जयंती असते.
यंदा मंगळवारी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. याच दिवशी हनुमानांचा जन्म झाल्याने हा शुभ योग असणार आहे.
धर्म ग्रंथांनुसार, हनुमान चिरंतन आहेत. ते आजही गंधमादन पर्वतावर निवास करतात. हनुमानाला चिरंतन राहण्याचे वरदान माता सीतेने दिले होते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.