भारतातील या मंदिरात मृत व्यक्तींच्या आत्म्याला मिळते मुक्ती

भारतात अनेक अशी मंदिरे, धार्मिक स्थळे आहेत ज्यांच्याबद्दलच्या गोष्टी अनोख्या आहेत. अशातच एक मंदिर भारतात असून तेथे मंदिरातील दडगावर स्वत:चे नाव लिहिल्याने मृत्यूनंतर आत्म्याला मुक्ती मिळते असे मानले जाते. याच मंदिराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Chanda Mandavkar | Published : Aug 14, 2024 3:06 AM IST / Updated: Aug 14 2024, 10:36 AM IST
15
ब्रजमधील रहस्यमी मंदिरे

भारतातील उत्तर प्रदेशातील ब्रज धाम म्हणजेच कृष्ण नगरीच्या अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. ब्रज क्षेत्राबद्दल असे म्हटले जाते की, येथील स्थापन करण्यात आलेली मंदिरे प्राचीन असली तरीही ते रहस्यमी देखील आहेत. असेच एक मंदिर वृदांवन येथे आहे. या मंदिरातील दडगावर आपले नाव लिहितात. यामागील काय कथा आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

25
श्री राधा वंशी गोपाल मंदिर

वृदांवनच्या युमना किनाऱ्यावर केसी घटावर श्री राधा वंशी गोपाल मंदिर आहे. याच मंदिरात राधा आणि श्रीकृष्ण विराजमान आहे. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, राधा-कृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या दडावर व्यक्ती आपले नाव जरुर लिहितो.

35
मंदिराबद्दलची मान्यता

श्री राधा वंशी गोपाल मंदिराबद्दलच्या दोन मान्यता आहेत. पहिली मान्यता अशी की, मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर त्याच्या आसपास असणाऱ्या दगडावर व्यक्तीने आपले नाव लिहिल्यास त्याच्या आयुष्यातील दु:ख दूर होण्यास सुरुवात होते.

45
मृत आत्म्याला मिळते मुक्ती

दुसरी मान्यता अशी की, दगडावर मनोभावे आपले नाव लिहिल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यातील संकटे दूर होण्यास सुरुवात होते. आयुष्यात आनंदाचे क्षण येतात. याशिवाय मृत व्यक्तीच्या नावाची फरशी मंदिरात लावली जाते. यामुळे मृत आत्मांना शांती मिळेते असे मानले जाते. एवढेच नव्हे जीवंत व्यक्तीला मृत्यूनंतर कृष्ण धाममध्ये स्थान मिळते अशीही मंदिराबद्दलची मान्यता आहे.

55
दगडांवर उडिया भाषेत लिहिलीत नावे

मंदिरात शेकडो दगड लावण्यात आले असून त्यावर व्यक्तींची नावे लिहिण्यात आली आहेत. याबद्दल असे बोलले जाते, एखादा ब्रृजवासी या दगडांवरुन चालत गेल्यास दिवंगत आत्म्यांना मोक्ष मिळतो. पुजारी असेही सांगतात की, येथील दडगांवर उडिया भाषेत नाव लिहिलेली दिसतात. हे मंदिर जेव्हापासून स्थापन करण्यात आले आहे तेव्हापासूनच व्यक्तींच्या नावाचे दगड लावले जातात.

(DISCLAIMER लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : अष्टविनायकाच्या 8 गणपतींच्या मंदिरांची वाचा अख्यायिका

श्रावणातील शनिवारी करा हे 5 उपाय, राहु-केतूसंबंधित सर्व समस्या होतील दूर

Share this Photo Gallery
Recommended Photos