Shravan 2024 : महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचा इतिहास, श्रावणात नक्की करा दर्शन

Shravan 2024 :  येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. या महिन्यात अनेक सणउत्सव साजरे करण्यासह उपवास करण्याचे फार महत्व आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार अत्यंत खास असून या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते.

Chanda Mandavkar | Published : Aug 3, 2024 8:21 AM IST / Updated: Aug 03 2024, 02:57 PM IST

15
वैजनाथ, परळी

वैजनाथ परळीचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मंदिराची स्थापना देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांच्या प्रधान श्रीकरणाधिप हेमद्री यांनी केली होती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी वैजनाथ मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. परळीतील वैद्यनाथ हे ‘वैद्यनाथ’ म्हणूनही ओखळले जाते. मंदिराच्या परिसरात मोठ्या पायऱ्या आणि भव्य असा प्रवेशद्वार आहे. याशिवाय तीन मोठी कुंडे देखील आहेत.

25
भीमाशंकर, पुणे

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकराचे मंदिर आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या मधून वाहणारी भीमा नदीही येथे आहे. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या रांगेत असून घनदाट जंगलाने वेढलेले आहे.

35
नागनाथ , हिंगोली जिल्हा

भारतातील पवित्रा बारा ज्योतिर्लिंगांपैकी पवित्र मानल्या जाणाऱ्या नागनाथांचे मंदिर हिंगोलीतील औंढ येथे आहे. या मंदिराचे प्राचीन नाव आमदर्क असे आहे. यामधून स्थलनामाची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. आमर्दक सन्तान नावाने ओखळल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे नाथनाथ हे प्रमुख पीठ आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या यात्रेचे आयोजन केले जाते.

45
त्र्यंबकेश्वर, नाशिक

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. श्रावणात तुम्ही नक्की त्र्यंबकेश्वरला भेट देऊ शकता. याच मंदिराजवळ निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आणि गोदावरी नदी आहे.

55
घृष्णेश्वर, औरंगाबाद

घृष्णेश्वर प्राचीन काळातील भगवान शंकरांचे मंदिर आहे. औरंगाबादमधील दौलताबाद पासून 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरुळच्या लेण्यांजवळ घृष्णेश्वर मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारतात या ठिकाणचे उल्लेख आहेत. मंदिराचे बांधकाम लाल रंगातील दगडामध्ये करण्यात आले असून त्यावर केलेले नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे.

आणखी वाचा : 

तब्बल 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होणार

भारतातील 5 रहस्यमयी नाग मंदिर, पूजा केल्याने दूर होतात आयुष्यातील मोठे दोष

Share this Photo Gallery
Recommended Photos