शिवपुराणातील या 5 गोष्टी आयुष्यात नेहमीच ठेवा लक्षात, मिळेल यशाचे फळ
Shiv Puran : शिवपुराणात ज्ञान, मोक्ष, व्रत, तप अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आयुष्यात पाळल्यास नक्कीच भगवान शंकरांचे आशीर्वाद मिळत यशाचे फळ मिळते असे म्हटले जाते.
भगवान सदाशिव यांच्या अद्भुत दिव्य कलांबद्दल शिव महापुराणात सांगितले आहे. जे 18 पुराणांमधील सर्वाधिक महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जाते. शिव महापुराणात भगवान शंकर यांच्या शक्ती, भक्ती आणि महिमेचे दिव्य वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये 24 हजार श्लोक आणि आठ संहिता (विद्येश्वर, रुद्र, शतरुद्र, कोटिरुद्र, उमा, कैलाश, वायवीय संहिता) असून त्या मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या आहेत.
यशस्वी आयुष्यासाठीचा शिवपुराणातील मंत्रा
शिवपुराणात भगवान शंकरांची भक्ती-शक्तीसह त्यांचे विविध अवतार, ज्योतिर्लिंग आणि संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुराणात ज्ञान आणि भक्तीसंदर्भातील देखील काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया शिवपुराणातील अशा काही गोष्टींबद्दल ज्या यशस्वी आयुष्यासाठी नक्कीच तुम्ही पाळल्या पाहिजेत.
संध्याकाळ
संध्याकाळची वेळ शंकरांची आहे. हा असा एक वेळ आहे जेव्हा भगवान शंकर आपल्या तिसऱ्या नेत्राने तिन्ही जगांकडे पाहतात. याशिवाय नंदी गणांसोबत भ्रमण करत असतात. यामुळे संध्याकाळी कटु वचन, अनैतिक कर्म, क्लेश, भोजन, यात्रा अशा काही गोष्टी करू नयेत. यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात.
निःस्वार्थ
कोणतेही काम करताना ते आनंदाचे करावे. जे काही चांगले-वाईट काम तुम्ही करत आहात त्याचे फळ मिळण्यासाठी स्वत:च जबाबदार असाल हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. यामुळे चुकीचे काम करताना असा कधीच विचार करू नये तुम्हाला कोणीही पाहत नाही. वाईट कर्मांचे फळ आयुष्यात मिळते.
मोहाचा त्याग
प्रत्येक व्यक्तीला एखादी वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, स्थान अशा गोष्टींचा मोह असतो. याच गोष्टी व्यक्तीच्या आयुष्यात दु:ख आणि अयशस्वीपणाचे कारण ठरते. यामुळे मोहाचा त्यात करुन आनंद आणि यशाच्या मार्गाने पुढे जावे.
पशू नव्हे मनुष्य व्हा
राग, द्वेष, वैमनस्य, अपमान आणि हिंसासारखी वृत्ती असणारा व्यक्ती पशूसमान असतो. पशूतेपासून मुक्ती मिळण्यासाठी भक्ती, साधन आणि मेडिटेशनची आवश्यकता असते.
संपत्ती
संपत्ती जमा करताना नेहमीच लक्षात ठेवावे की, ती योग्य मार्गाने असावी. मेहनतीने धन कमवावे. कमावलेल्या धनाचे तीन भाग करावे. एक भाग उपभोगासाठी, दुसरा धर्म-कर्मांसाठी आणि तिसरा भाग भविष्यासाठी असावा.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)