साडी नेसणे प्रत्येक महिलेला पसंत असते. यामुळे महिलेचे सौंदर्य अधिक खुलले जाते. अशातच सडपातळ आणि उंच महिलांना साडी नेसल्यानंतर आपण कसे दिसू याचे टेन्शन येते. अशातच काही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून साडी नेसल्यास नक्कीच चारचौघात उठून दिसाल.
Saree Draping Tips : सडपातळ महिलांनी साडी नेसताना काही खास स्टायलिंग टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन साडी नेसल्यानंतर लूक अधिक खुलला जाईल. अशातच सडपातळ आणि उंच महिलांनी साडी नेसताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दल पुढे जाणून घेऊया...
सडपातळ महिला फ्लेअर्ड साडीची निवड करू शकता. या साड्यांना आधीच खास पद्धतीने ड्रेप करण्यात आलेले असते. यामुळे अशा साड्या अंगाला परफेक्ट बसतात. फ्लेअर्ड साड्यांमध्ये शिफॉन किंवा जॉर्जेट साड्या सडपातळ महिलांनी नेसाव्यात.
हेव्ही बॉर्डर आणि एम्ब्रॉयडरी असणारी साडी सडपातळ महिलांवर शोभून दिसते. यामुळे तुमचा लूक अधिक खुलला जातो. हेव्ही बॉर्डर आणि बारीक नक्षीकाम करण्यात आलेली साडी तुम्हाला शाही लूक देईल. यासाठी कढाई वर्क करण्यात आलेली साडी ट्राय करू शकता.
सडपातळ महिलांनी साडीच्या निऱ्या मोठ्या आणि सैल ठेवाव्यात. यामुळे साडीत अधिकच बारीक दिसणार नाहीत.
हेही वाचा : मकर संक्रांतीला नेसा या 5 प्रकारच्या Black Sarees, दिसाल मनमोहक
साडीवर परफेक्ट मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज फार सुंदर दिसते. पण ब्लाऊजचे फिटिंग तुमच्या लूकला अधिक खुलवेल. सडपातळ महिलांनी अंगाला घट्ट बसणारे ब्लाऊज ट्राय करण्याएवजी फुग्यांचे हात असणारे ब्लाऊज घाला.
सडपातळ महिलांनी साडी नेसताना कंबरेपासून नेसण्यास सुरुवात करावी. जेणेकरुन कंबरेखालील भागात साडीचा घेर व्यवस्थितीत दिसेल.
साडीवर परफेक्ट अशी ज्वेलरी असावी. सडपातळ महिलांनी मोठ्या आणि भरलेला चूडा, चोकर नेकलेस किंवा हेव्ही झुमके साडीवर घालावेत. यामुळे लूक अधिक खुलला जाईल. याशिवाय हेअरस्टाइल आणि मेकअपही साडीला मॅच होईल असा करावा.
आणखी वाचा :
Makar Sankranti 2025 वेळी 2K मध्ये खरेदी करता येतील असे 8 सलवार सूट
बायकोला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी मंगळसूत्राच्या 8 डिझाइन, होईल खुश