लग्नानंतर मुलीचे सासर हाच तिचा परिवार असल्याचे सांगितले जाते. पण माहेरची ओढ प्रत्येक मुलीला असते. अशातच लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीने कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया.
Relationship Advice : लग्नानंतर माहेरची ओढ विवाहित मुलींना अधिक वाटू लागते. अशातच लग्नानंतर माहेरी कधी जाणार याची प्रत्येक मुलीकडून वाट पाहिली जाते. येथे आपल्या इच्छा पूर्ण केल्या जातात हे मुलीला माहिती असते. पण लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन नात्यावर त्याचा परिणाम होणार नाही. जाणून घेऊया नवविवाहित मुलीने माहेरी आल्यावर कोणत्या चुका करू नयेत याबद्दल सविस्तर...
सासरची मंडळी खूप चांगली असली असली तरीही त्यांच्याबद्दल माहेरी सतत गोडवे गाऊ नये. माहेरी आल्यानंतर आई-वडिलांची विचारपूस करावी. तेथील आठवणींना उजाळा देण्यासह परिवारातील मंडळींसोबत अधिकाधिक वेळ घालवा.
सासरची मंडळी खूप श्रीमंत असल्यास आणि माहेरची स्थिती मध्यमवर्गीय असल्यास कधीच आपल्या आई-वडिलांसमोर सासरच्या पैशांबद्दल मोठेपणा करू नये. यामुळे माहेरच्या व्यक्तींचा अपमान केल्यासारखे होते. याशिवाय कळत किंवा नकळतपणे कधीच नात्यांमध्ये पैशांचे व्यवहार देखील आणू नये.
हेही वाचा : Chanakya Niti : या 3 प्रकारचे लोक आयुष्यभर राहतात श्रीमंत, मिळवतात यश
लग्नापूर्वी जसे माहेरी वागत होता तसेच लग्नांतरही वागा. प्रत्येकवेळी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्याला हाताशी घेऊन कामे करण्यास सांगू नका. माहेरी आल्यानंतर आईला कामात मदत करा.
लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आल्यानंतर सासरच्या मंडळींचे गोडवे गाणे टाळाच. पण माहेरच्या व्यक्तींवर आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्नही करु नका. जसे की, महागडे गिफ्ट्स खरेदी करुन देण्याचा घट्ट माहेरच्यांकडे करणे टाळा. असे केल्याने माहेरच्या व्यक्तींसोबतचे नातेसंबंध बिघडले जातील.
काही मुली अशा असतात की, सासरहून पहिल्यांदा माहेरी आल्यानंतर तेथील लाइफस्टाइल पाहून बदलल्या जातात. यामुळे माहेरच्या मंडळींच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. अशातच माहेरी आल्यास सतत त्यांच्यामधील उणीवा शोधून काही मुली आई-वडिलांना टोचूनही बोलतात. तर मुलीने अशी चुक करणे टाळा. नेहमीच आपल्या माहेरच्या व्यक्तींचा आदर-सन्मान करा.
आणखी वाचा :
Chanakya Niti: या 3 प्रकारच्या लोकांना पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख मिळते
मुल सतत रडतं आणि घाबरतं? 'या' ५ टिप्सनी मुलांना बनवा मानसिकदृष्ट्या मजबूत