यंदाच्या मकर संक्रांतीवेळी अशाप्रकारचा काळ्या रंगातील अनारकली सूट ट्राय करू शकता. यावर कढाई वर्क करण्यात आलेली ओढणी ट्राय करू शकता.
गोटापट्टी लेस वर्क असणारा अनारकली सूट तुम्हाला मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनही पाहता येईल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचा जॉर्जेट सूट मकर संक्रांतीला ट्राय करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणीही छान दिसेल.
शरारा सूट मकर संक्रांतच नव्हे तर अन्य कोणत्याही फंक्शनवेळी परिधान करू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी सुंदर दिसेल.
हँड वर्क करण्यात आलेला अशाप्रकारचा काळ्या रंगातील सिल्क सूट मकर संक्रांतीवेळी खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्न ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने खरेदी करता येतील.
सध्या चिकनकारी सूटचा ट्रेन्ड आहे. यामुळे काळ्या रंगातील चिकनकारी सूट यंदाच्या मकर संक्रांतीवेळी तुमचा लूकला चार चांद लावू शकतो.
प्लेन ब्लॅक शिफॉन सूटवर सिल्व्हर रंगातील वर्क करण्यात आलेला सूट मकर संक्रांतीवेळी परिधान करू शकता. अशाप्रकारचा सूट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.