यंदाच्या मकर संक्रांतीला अशाप्रकारची सिल्क ब्लॅक साडी नेसू शकता. यावर फुल हँड ब्लाऊज ट्राय करा. याशिवाय एथनिक चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण करा.
मकर संक्रांतीला आलिया भट्टसारकी व्हेलवेट साडी नेसू शकता. या साडीच्या काठाला गोल्डन रंगातील लेस लावल्याने साडी अधिक सुंदर दिसतेय. यावर मोत्याची चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता.
काळ्या रंगातील इंडिगो साडी मकर संक्रांतीसाठी बेस्ट आहे. यावर सिल्व्हर रंगातील ज्वेलरी घालू शकता.
येत्या 14 जानेवारीला साजरा केल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीला अशाप्रकारची फ्लोरल साडी नेसू शकता. सिंपल आणि सोबर लूकसाठी फ्लोरल साडी बेस्ट आहे.
मकर संक्रांतीला सोबर लूकसाठी अशाप्रकारची काळ्या रंगातील ठसर सिल्क साडी नेसू शकता. या साडीच्या काठाला गोल्डन रंगातील बॉर्डर दिली आहे.