पगारासाठी वापरला जाणारा 'सॅलरी' शब्द नक्की कोठून आलाय? जाणून घ्या इतिहास

कोणत्याही नोकरीचा मूळ उद्देश पैसे कमावणे असतो. पण तुम्हाला माहितेय का, सॅलरी शब्द नक्की कोठून आलाय? याबद्दलचा इतिहास जाणून घेऊया सविस्तर...

Chanda Mandavkar | Published : Feb 24, 2024 6:41 AM IST / Updated: Feb 24 2024, 12:16 PM IST

Salary Word History : कोणतीही नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पैसे कमावणे फार महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस प्रत्येकजण सॅलरीची वाट पाहतो. पण तुम्हाला माहितेय का सॅलरी शब्द नक्की कोठून आलाय? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

सॅलरीच्या रुपात मिळायचे मीठ
प्राचीन रोममध्ये आधी पैशांऐवजी मीठाचा वापर केला जायचा. त्यावेळी जे सैनिक रोमन साम्राज्यासाठी काम करायचे त्यांना कामाच्या बदल्यात मीठ दिले जायचे. खरंतर मीठ, सैनिकांना त्यांच्या कामाच्या मेहनतीसाठी दिले जायचे.

‘सॅलरी’ शब्द असा आला
इंडिया टुडेच्या एका रिपोर्ट्सनुसार, रोमन इतिहासकार प्लिनी द एल्डर (Pliny the Elder) यांनी आपले पुस्तक ‘नॅच्युलर हिस्ट्री’ मध्ये म्हटलेय की, रोममध्ये आधी सैनिकांना आपल्या कामाच्या मेहनतीसाठी मीठ दिले जायचे. येथूनच सॅलरी शब्द आला आहे. खरंतर, Salt वरुन Salary शब्द आला आहे. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की, Soldier शब्द लॅटिनमध्ये ‘sal dare’ पासून तयार झाला आहे. याचा अर्थ मीठ देण्यासंदर्भात आहे. रोमनमध्ये मीठाला ‘सॅलेरिअम’ असे म्हटले जाते आणि यावरुनच सॅलरी शब्द तयार झाला आहे.

पगाराच्या रुपात मिळायचे मीठ
फ्रान्समधील इतिहासकारांच्या मते, पहिल्यांदा सॅलरी 10,000 ईसवी सनाआधी 6,000 ईसवी सन पूर्वच्यादरम्यान दिली गेली होती. प्राचीन रोममध्ये नागरिकांना कामाच्या बदल्यात पैसे नव्हे तर मीठ दिले जायचे. त्यावेळी रोमन साम्राज्यातील सैनिकांना ड्युटीच्या बदल्यात पगाराच्या बदल्यात एक मूठ मीठ दिले जायते. खरंतर, त्या काळी मीठाचा व्यापार केला जायचा.

मीठ मिळणे म्हणजे व्यक्तीला निष्ठावंत मानले जायचे
हिब्रु पुस्तक एजारामध्ये 550 आणि 450 ईसवी सन पूर्वचा उल्लेख आहे. यामध्ये लिहिले आहे की, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून मीठ घेतल्यास ते पगारासमान आहे. त्यावेळी मीठाला फार महत्त्व होते. एकेकाळी मीठावर त्या व्यक्तीचा हक्क असायचा ज्याची सत्ता असायची. या पुस्तकात एक प्रसिद्ध फारसी राजा आर्टॅक्सर्क्सेस प्रथमचा (Artaxerxes I) उल्लेख आहे. या राजाचे नोकर आपल्या निष्ठेबद्दल सांगताना म्हणायचे की, आम्हाला राजाकडून मीठ मिळायचे. यामुळे राजाच्या प्रति आम्ही निष्ठावंत असल्याचे दर्शवण्यासारखे आहे.

आणखी वाचा : 

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त दान करा या गोष्टी, होईल आर्थिक भरभराट

Spam Calls मुळे त्रस्त आहात? दूर राहण्यासाठी ही सोपी ट्रिक येईल कामी

Deepfake च्या प्रकरणांना आळा बसण्यासाठी मेटाचा नवा प्लॅन, युजर्सला रिपोर्ट करणे होणार सोपे

Share this article