Deepfake च्या प्रकरणांना आळा बसण्यासाठी मेटाचा नवा प्लॅन, युजर्सला रिपोर्ट करणे होणार सोपे

डीपेकच्या प्रकरणांवर आळा बसण्यासाठी जगभरातील 20 पेक्षा अधिक टेक कंपन्या एक प्लॅन तयार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटा देखील मिस इन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्ससोबत भागीदारी करत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक लवकरच जारी करणार आहे.

META New Plan for Deepfake Cases : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात डीपफेकची प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी जगभरातील 20 पेक्षा अधिक टेक कंपन्यांकडून एक मोठा प्लॅन तयार केला जात आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या सध्याच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांचे आयुष्य अगदी सोपे झाले आहे. पण दुसऱ्या बाजूला एआयच्या (AI) वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एआयचा वापर करत व्यक्तींचा चेहरा आणि आवाज क्लोन केला जातो. यामुळे कोणत्याही व्यक्तीची सहज फसवणूक होऊ शकते.

डीपफेकच्या विरोधात उतरल्यात टेक कंपन्या
भारतासह जगभरात डीपफेकची प्रकरणे अलीकडल्या काळात फार वाढली गेली आहेत. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची कंपनी मेटा, मिस इन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्ससोबत भागीदारी करत एक पॉलिसी बनवण्याच्या तयारीत आहे. मेटानुसार, भारतात डीपफेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बनावट व्हिडीओ आणि पोस्टच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाणार आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून युजर्सला कोणत्याही डीपफेक व्हिडीओ अथवा पोस्टच्या विरोधात तक्रार दाखल करता येईल.

मिस इन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्स असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष भरत गुप्ता यांनी म्हटले की, भारतात सोशल मीडिया आणि इंटरनेट युजर्सदरम्यान आर्टिफिशिअल इंटिलिजेंसचा वापर करून तयार करण्यात आलेली चुकीची माहिती पसरवण्यावर आळा बसण्यासाठी डीपफेक अ‍ॅनालिसिस युनियन गरजेचे आहे.

दरम्यान, डीपफेक व्हिडीओच्या प्रकरणांपासून दूर राहण्यासाठी मेटा गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या मोठ्या 20 कंपन्या एकत्रित मिळून काम करत आहेत.

सिनेसृष्टीतील कलाकारांना डीपफेकचा फटका
भारतासह जगभरातील काही कलाकारांचे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील अभिनेत्री रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याशिवाय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीलाही डीफेकचा फटका बसला होता.

आणखी वाचा : 

Deepfake Videos : डीपफेक व्हिडीओ कसा ओळखावा? या गोष्टी ठेवा लक्षात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे डीपफेक फोटो-व्हिडीओ व्हायरल, White Houseने दिली अशी प्रतिक्रिया

Spam Calls मुळे त्रस्त आहात? दूर राहण्यासाठी ही सोपी ट्रिक येईल कामी

Share this article