Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त दान करा या गोष्टी, होईल आर्थिक भरभराट

Published : Feb 22, 2024, 04:40 PM ISTUpdated : Feb 22, 2024, 04:45 PM IST
Maha Shivratri 2024

सार

महाशिवरात्री हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. ज्योतिष शास्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी एखादी वस्तू दान करणे शुभ मानले जाते.

Mahashivratri 2024 :  येत्या 8 मार्चला महाशिवरात्री मोठ्या आनंद-उत्साहात साजरी केली जाणार आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, महाशिवारात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. असे देखील सांगितले जाते की, या दिवशी भगवान शंकरांचा शिवलिंगात अवतार झाला होता. महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजा करण्यासह शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. याशिवाय भक्त शंकराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी दानधर्मही करतात. जाणून घेऊयात महाशिवरात्री निमित्त कोणत्या वस्तू दान कराव्यात. जेणेकरुन घरात आर्थिक भरभराट होईल.

दूधाचे दान
महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या पिंडीवर दूधाने अभिषेक केला जातो. यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी गरजूंना दूधाचे दान करू शकता. यामुळे तुमच्या पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होण्यास तुम्हाला मानसिक शांती मिळते. याशिवाय तुमचे कामात मन लागते, घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.

तूपाचे दान
असे मानले जाते की, महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही शंकराच्या पिंडीवर तूप अर्पण केल्यास घरातील सर्व समस्या दूर होतात. याशिवाय नकारत्मकताही दूर होते. घरातील वातावरण सकारात्मक होते. कोणतीही अशुभ घटना घडत नाही.

तीळाचे दान
महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही तीळाचे दान आवश्यक करा. याशिवाय शंकरांच्या पिंडीवर तीळ अर्पण केल्यास पितृ दोषापासून मुक्तता होते असे मानले जाते. आयुष्यात शुभ संकेत मिळतात आणि अपूर्ण कामेही पूर्ण होतात.

वस्र दान
कर्ज आणि आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी वस्र दान अत्यावश्यक करा. यामुळे भगवान शंकराचे आशीर्वाद मिळतात आणि तुमची आर्थिक भरभराट होते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराला चुकूनही वाहू नका हे फूल

कोण आहेत स्वामी नारायण? UAE मधील मंदिरात केली जाते पूजा

कॅक्टसच्या या उपायांनी दूर होतील आयुष्यातील समस्या

PREV

Recommended Stories

Health Care : पीरियड्सवेळी थकवा येतो? करा हे घरगुती उपाय
चांदीचे दागिने नव्यासारखे चमकवा, या ट्रिकने डाग मिनिटात जातील निघून