Mrs. अंबानी झाल्यानंतर राधिकाचा बदलला लूक, आशीर्वाद सेरेमनीला परिधान केला सुंदर असा हँडपेंटेड लेहेंगा, See Photos

Published : Jul 13, 2024, 11:34 PM ISTUpdated : Jul 13, 2024, 11:39 PM IST

Radhika Merchant Ambani Look : अनंत अंबानीसोबत लग्न केल्यानंतर अखेर राधिका मर्चेंट अंबानी परिवाराची सून झाली आहे. सून झाल्यानंतर राधिकाचा लूक बदललेला दिसून आलाच. पण शुभ आशीर्वादवेळी परिधान केलेल्या खास लेहेंग्याची मात्र चर्चा झाली. 

PREV
17
अंबानींच्या धाकट्या सूनेचा नवा लूक

राधिका मर्चेंट अखेर अंबानी परिवाराची सून झाली आहे. अशातच अंबानी परिवारातील धाकट्या सूनेचा नवा लूक समोर आला आहे. राधिकाने शुभ आशीर्वाद सेरेमनीला परिधान केलेल्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

27
अबू जानी आणि संदीप खोसला यांचा लेहेंगा

राधिकाने शुभ आशीर्वाद सेरेमनीसाठी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला होता. या गुलाबी लेहेंग्यात राधिका कमालीची सुंदर दिसत होती.

37
आर्टिस्ट जयश्री बर्मन यांचे नक्षीकाम

राधिकाच्या लूकसाठी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आर्टिस्ट जयश्री बर्मन यांच्यासोहत मिळून अनोखा आणि सुंदर असा लेहेंगा तयार केला. फॅशन स्टायलिस्ट रेहा कपूरच्या कल्पनेतून राधिकाचा लेहेंगा साकारण्यात आला आहे.

47
इटॅलियन कॅनव्हासवर हँडपेटिंग

जयश्री यांनी केलेले हँडपेटिंगला वेगळा लूक येण्यासाठी लेहेंग्यावरील 12 पॅनलपैकी एकावर स्पेशल इटालियन कॅनव्हासवर हँडपेंटिंग करण्यात आली आहे. जयश्री यांनी पौराणिक कलाकृती साकारत अत्यंत खास लेहेंगा तयार केला आहे.

57
अशाप्रकारे करण्यात आला डिझाइन

राधिकाच्या लेहेंग्यावर पशू-पक्षी यांच्यासह काही मानवकृती साकारण्यात आल्या आहेत. या सर्वांप्रति असलेले प्रेम लेहेंग्याच्या डिझाइनमधून दिसून येत आहे.

67
सोन्याचे जरदोजी वर्क

राधिकाच्या लेहेंग्यावर अत्यंत सावधगिरीने सोन्याचे जरदोजी वर्क करण्यात आले आहे.

77
राधिकाचा खास लेहेंगा

Recommended Stories