Anant-Radhika Wedding : 'मेरे यार की शादी है' Vs 'अनंत ब्रिगेड' मधील मंडळींच्या खास Outfits ची चर्चा
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी खास आउटफिट्स परिधान केल्याचे दिसून आले. यावेळी मेरे यार की शादी Vs अनंत ब्रिगेड डिझाइन करण्यात आलेल्या आउटफिट्सचे काही फोटो समोर आले आहेत.
अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याला अभिनेता अर्जुन कपूरने ‘मेरे यार की शादी’ डिझाइन करण्यात आलेला गोल्डन रंगातील शेरवानी परिधान केली होती.
26
ऑरीचा अंतरंगी लूक
नेहमीप्रमाणेच आताही अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी मल्टीकलर रंगातील शेरवानी घातली होती. यावरही ‘मेरे यार की शादी’ लिहिले आहे.
36
बोनी कपूर यांची हटके एण्ट्री
बोनी कपूर यांनी अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी गोल्डन रंगातील कुर्ता आणि पटियाला पायजमा घातला होता. बोनी कपूर यांच्या कुर्त्यावरही लाल रंगात ‘मेरे यार की शादी’ असे लिहिले होते.
46
अनन्या पांडेचा गॉर्जियस लूक
अनन्या पांडेने पिवळ्या रंगातील लेहेंगा-चोली परिधान केली होती. या आउटफिटवर ‘अनंत ब्रिगेड’ असे लिहिले आहे.
56
शनायाने कॉपी केला अनन्याचा लूक
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी अनन्या पांडेसारखेच आउटफिट असणारा रॉयल ब्लू रंगातील लेहेंगा परिधान केला होता. यावरही ‘अनंत ब्रिगेड’ असे लिहिण्यात आले होते.
66
खुशी कपूरचा अनोखा लूक
खुशी कपूरनेही अन्यन्या, शनायासारखाच लूक कॉपी केला होता. खुशी कपूरने हिरव्या रंगातील लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावरील चोलीवर ‘अनंत ब्रिगेड’ लिहिले होते.