श्लोका आणि राधिकासोबतचे कसे आहेत इशा अंबानीचे नातेसंबंध? नीता अंबानींची लेक म्हणते...
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची एकुलती एक लेक इशा अंबानीचे नेहमीच परिवाराकडून लाड केले जात असल्याचे दिसून येते. याशिवाय इशा आकाश आणि अनंतच्या आयुष्यातील सर्वाधिक जवळची व्यक्तीही आहे. पण सूनांसोबतचे नातेसंबंध कसे आहेत याचा खुलासा इशानेच केला आहे.
Chanda Mandavkar | Published : Jul 6, 2024 7:51 AM IST / Updated: Jul 12 2024, 01:32 PM IST
इशा अंबानीचे परिवारासोबतचे खास नातेसंबंध
इशा अंबानीचे लग्न झाले तरीही ती आपल्या परिवाराच्या अत्यंत जवळ आहे. नीता आणि मुकेश अंबानींची इशा अत्यंत लाडकी लेक आहे. वेळोवेळी इशाला आपल्या आई-वडिलांसोबत स्पॉट करण्यात येते. अशातच अंबानी परिवारासोबत इशाचे नातेसंबंध कसे आहेत याबद्दलच्या खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.
अंबानी परिवार मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते- इशा अंबानी
इशा अंबानीने मुलाखतीत म्हटले की, तिच्या हृदयात आपल्या परिवारातील सदस्यांसाठी एक खास जागा आहे. तिची आई नीता अंबानी, वहिनी श्लोका आणि राधिकाही सर्वाधिक जवळच्या आहेत. खरंतर, मी अत्यंत भाग्यवान आहे मला असा परिवार मिळाला अशीही प्रतिक्रिया इशाने मुलाखतीत दिली आहे.
इशाचे राधिकासोबतचे नातेसंबंध
अनंत अंबानी याची होणारी पत्नी राधिका मर्चेंटसोबत इशाचे नातेसंबंध कसे आहेत याबद्दलचा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावेळी इशाने म्हटले की, इशा माझ्यासाठी माझ्या आईप्रमाणे आहे. अनंत नेहमीच माझ्या आयुष्यात एखाद्या लहान मुलासारखा राहिला आहे. अनंतवर माझे खूप प्रेम आहे. यामुळेच राधिकाला मी आईच्या दृष्टीकोनातून पाहते.
श्लोकासोबतचे इशाचे संबंध
श्लोका मेहतासोबतचे इशाचे नातेसंबंधही उत्तम आहेत. इशा म्हणते की, श्लोका आणि राधिका माझ्या सर्वाधिक जवळच्या विश्वासू आणि पहिल्या मैत्रीणी आहेत. श्लोका बालपणापासूनच माझी मैत्रीण राहिली आहे. मी अत्यंत भाग्यवान आहे की, माझ्या भावाने ज्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला ती व्यक्ती माझी सर्वाधिक उत्तम मैत्रीण श्लोका होती.
श्लोकाने बहिणीचे नाते निभावले
इशा म्हणते, आम्ही जसे वयाने मोठे होत गेलो तसे श्लोकाने माझ्या आयुष्यात एका बहिणीप्रमाणे साथ दिली. आम्ही लंडनमध्ये एकाच घरात राहिलो आहोत. आम्ही मुलांसोबतही आहोत. इशा आणि आकाश अंबनी ट्विंस भाऊ-बहिण आहेत. दोघांनी धीरूभाई इंटरनॅशनल शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. या शाळेत श्लोकानेही शिक्षण घेतले आहे. आकाश अंबानीने श्लोकाला 12 वी परिक्षेनंतर प्रपोज केले होते.
अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा येत्या 12 जुलैला मुंबईत हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. यानंतर 13 जुलैला 'शुभ आशीर्वाद' आणि 14 जुलैला 'मंगल उत्सव' साजरा केला जाणार आहे.