Narak Chaturdashi 2024 निमित्त मित्रपरिवाराला मराठमोळे संदेश पाठवून साजरा करा सण

कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हटले जाते. याशिवाय नरक चतुर्दशीला छोटी दिवाली असेही म्हटले जाते. यंदाच्या नरक चतुर्दशीनिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र, मराठमोळे संदेश, Whatsapp Status पाठवून आजचा दिवस साजरा करू शकता.

Chanda Mandavkar | Published : Oct 30, 2024 3:11 AM IST / Updated: Oct 30 2024, 08:42 AM IST

Narak Chaturdashi 2024 Wishes in Marathi : यंदा छोटी दिवाली म्हणजेच नरक चतुर्दशी आज (30 ऑक्टोबर) साजरी केली जात आहे. या दिवसी मृत्यूचे देवता यमराज यांच्या पूजेचे विशेष महत्व आहे. अशी मान्यता आहे की, नरक चतुर्दशीच्यावेळी यमराज यांची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती कमी होते. याशिवाय भक्त स्नान केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि यमराज यांची पूजा करतात. आजच्या नरक चतुर्दशीनिमित्त मित्रपरिवाला खास संदेश पाठवून दिवाळीआधी साजरी केल्या जाणाऱ्या सणाच्या शुभेच्छा द्या…

पुन्हा दिव्यांचा सण आला आहे,
म्हणून आनंदाने साजरा करा,
दुःख विसरा. ही नरक चतुर्दशी
तुम्हाला घरी भाग्य घेऊन येवो आणि
तुमची पुन:पुन्हा भरभराट होत राहो...

श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश, नरक चतुर्दशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

सत्याचा नेहमीच असत्यावर प्रभाव राहो! अन्यायाचा प्रतिकार करण्यास तुम्हाला बळ लाभो! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा…

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो! नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Diwali 2024 : लक्ष्मीपूजनासाठी साठी नोट करा हे 4 शुभ मुहूर्त

दिवाळीवेळी चुकूनही करू नका ही 5 कामे, व्हाल कंगाल

 

Read more Articles on
Share this article