कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, व्यावसायिक नातेसंबंध, आसपासची मंडळी यांच्याशिवाय कोणतेही ध्येय गाठणे अशक्य आहे; हे यशस्वी लोकांना (What Makes A Person Successful In Life) चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या लोकांकडून नातेसंबंधांना खूप प्राधान्य दिले जाते आणि ते टिकवूनही ठेवले जाते.
म्हणूनच ही मंडळी व्यावसायिक नातेसंबंधांसह अन्य नात्यांमध्येही आपली गुंतवणूक करतात. ज्यामुळे मार्गदर्शन, सहयोग आणि समर्थन मिळवण्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.