Konkan Travel : रत्नागिरीमधील 5 अविस्मरणीय समुद्रकिनारे

Published : Jan 17, 2025, 04:09 PM IST
places to visit in konkan

सार

Ratnagiri 5 Travel Destination : कोकणातील रत्नागिरीला सुंदर, निळाशार समुद्रकिनारा लाभला आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. याबद्दलच जाणून घेऊया. 

Ratnagiri 5 Travel Destination : कोकणात प्रवास करणे स्वर्गासमान आहे. खरंतर, कोकणाला लाभलेला निळाशार समुद्र, उंचच उंच नाराळाची झाडे आणि कौलारू घरांमुळे याचे सौंदर्य अधिक वाढले जाते. कोकणात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण कोकणातील रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी कोणती ठिकाणे आहेत याबद्दल जाणून घेऊया. याशिवाय रत्नागिरातील ठिकाणांची खासियत काय आहे हे देखील पाहूया. 

गुहागर

मुंबईपासून 280 कि.मी. असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर श्री व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोकणी पद्धतीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या घरांची अंगणे विविध रांगोळ्यांनी सजवलेली असतात. व्याडेश्वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट.

भाट्ये बीच

रत्नागिरीपासून अगदी जवळ असणारं भाट्ये हे छोटंसं गाव तिथल्या समुद्रकिनाऱ्यासाठी विशेष ओळखलं जातं . इथला लांबलचक समुद्रकिनारा मनाला विशेष भुरळ घालतो . हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या समुद्राकडे तासनतास बघण्यात वेळ कसा छान जातो . साधारण दीड किलोमीटरच्या परिसरात हा समुद्रकिनारा पसरला असून सकाळच्या वेळी ओल्या वाळूवर चालून एक वेगळा आनंद घेता येतो . या बीचमधून रत्नागिरीचं लाईट हाऊस आणि मांडवी बीचदेखील दिसतो . समुद्रावरच्या भेळपुरीची मज घ्यायची असेल तर इथे जायलाच हवं . सगळ्या प्रकारच्या चाट बीचजवळ बसून खाता येत असल्याने पर्यटकांना हा किनारा आवडतो . एक संपूर्ण दिवस आराम करून निसर्गाच्या सोबतीनं राहायचं असेल तर भाट्ये बीच हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

कुंकेश्वर

भारतात समुद्रकिनार्यावरील काही प्रसिद्ध मंदिरे आहेत आणि त्यापैकी कुंकेश्वर एक आहे. कुंकेश्वर हे भेट देण्यासारखे आहे. येथील समुद्रकिनारा छोटा आणि सुंदर आहे आणि मंदिर अगदी विलक्षण आणि उंच आहे.

आरे वारे

एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन' पाहायचे असेल, तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीच ला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आरेवारे समुद्रकिनारा आहे. दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेता येतो.

देवगड

कुटुंबासह संध्याकाळी आराम करण्यासाठी छान स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा. इथे अत्यंत शांत अशा समुद्राच्या पाण्यात किंवा किनाऱ्यावर वाळूने खेळण्याचा आनंद घेऊ शकता. बीचच्या प्रवेशद्वाराजवळ मुलांसाठी काही लहान लहान सवाऱ्या आहेत. हे दृश्य खूपच मंत्रमुग्ध करणारे आहे.

आणखी वाचा : 

Maha Kumbh Mela 2025 : अघोरी बाबा कोणाची पूजा करतात?

Night Sleep: रात्री झोपायच्या आधी काय करावं, गोष्टी जाणून घ्या

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!