फक्त 10 रुपयांत डार्क सर्कल्स होतील दूर, वापरा ही वस्तू

Published : Jan 17, 2025, 03:26 PM IST
dark circles

सार

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि बी3 भरपुर प्रमाणात असते. याच्या मदतीने त्वचा चमकदार होण्यास मदत होऊ शकते. अशातच घरच्याघरी डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर करू शकता.

Potato juice for dark circle : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्किन केअर रुटीन व्यवस्थितीत फॉलो करू शकत नाही. यामुळे त्वचा निस्तेज होऊ लागते. अशातच स्किन केअरमुळे त्रस्त आहात आणि कमी वेळात त्वचेला ग्लो कसा येईल असा विचार करताय तर बटाटा बेस्ट पर्याय आहे. याच्या मदतीने डार्क सर्कलची समस्याही दूर होऊ शकते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी6, अँटीऑक्सिडेंट्स अशी पोषण तत्त्वे असतात. त्वचा अतिसंवेदनशील असल्यास बटाट्याचा रस वापरू शकता.

बटाट्याच्या मदतीने डार्क सर्कल होतील दूर

बटाट्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे त्वचेला ग्लो येण्यास मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेचा टोन सुधारला जातो. बटाट्यामध्ये पोटॅशियमही असते. यामुळे त्वचा हाइड्रेट आणि मॉइश्चर राहते.

बटाट्याचा रसाचा असा करा वापर

दररोज अर्धा बटाटा कापून त्याची साल काढा. यानंतर बटाट्याचा रस कॉटन बॉल्सच्या मदतीने डोळ्यांखाली 10-15 मिनिटांसाठी ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेला ग्लो येईल. पहिल्यांदाच बटाट्याचा रस त्वचेवर लावणार असल्यास त्याआधी हातावर पॅच टेस्ट करुन पाहा. याशिवाय त्वचेसंबंधित एखादी समस्या असल्यास बटाट्याचा रस लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा : 

केसांच्या वाढीसाठी बेस्ट आहेत हे 5 तेल, आठड्याभरात दिसेल फरक

दूधासोबत खा या 2 गोष्टी, होतील हे 5 आरोग्यदायी फायदे

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!