IRCTC Tirupati Kolhapur Tour : एकाच तिकीटात तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन!

Published : Oct 05, 2026, 12:30 PM IST

IRCTC ने तिरुपती आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनासाठी ५ रात्री आणि ६ दिवसांचं स्पेशल टूर पॅकेज आणलं आहे. या पॅकेजचे दर आणि प्रवासाची संपूर्ण माहिती इथे जाणून घ्या.

PREV
16
भाविकांसाठी आनंदाची बातमी! तिरुपती आणि कोल्हापूर दर्शनासाठी स्पेशल ट्रेन
तिरुपतीचा श्री व्यंकटेश बालाजी म्हणजे देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं (अंबाबाई) दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेला लक्षात घेऊन IRCTC ने 'तिरुपती विथ कोल्हापूर महालक्ष्मी' हे खास टूर पॅकेज आणलं आहे.
26
टूर पॅकेजचं वेळापत्रक आणि प्रवासाचा मार्ग
हे पॅकेज ५ रात्री आणि ६ दिवसांचं असून दर बुधवारी उपलब्ध असेल. यात 3AC इकॉनॉमी आणि नॉन-एसी स्लीपर (SL) चे प्रत्येकी ८ सीट्स आहेत. मुंबईतून सुरू होणारा हा प्रवास तिरुपती, पद्मावती मंदिर, श्रीकाळहस्ती आणि कोल्हापूरची महालक्ष्मी कव्हर करून पुन्हा मुंबईत संपेल. ट्रेन नंबर 12163 (LTT-MAS), 17415 (हरिप्रिया एक्सप्रेस) आणि 17412 (महालक्ष्मी एक्सप्रेस) ने हा प्रवास होईल.
36
असा असेल तुमचा रोजचा प्रवास
पहिल्या दिवशी LTT वरून संध्याकाळी ट्रेन सुटेल. दुसऱ्या दिवशी रेणिगुंटा स्टेशनवर उतरून हॉटेलवर चेक-इन होईल आणि तिरुपती बालाजी व पद्मावती देवीचं दर्शन मिळेल. तिसऱ्या दिवशी श्रीकाळहस्तीचं दर्शन घेऊन रात्री कोल्हापूरसाठी ट्रेन पकडायची आहे. चौथ्या दिवशी कोल्हापुरात पोहोचून अंबाबाईचं दर्शन घेता येईल. पाचव्या दिवशी जोतिबा, न्यू पॅलेस आणि कणेरी मठाला भेट देऊन रात्री मुंबईसाठी परतीचा प्रवास सुरू होईल.
46
तिकीट दरांची संपूर्ण माहिती
3AC इकॉनॉमीमध्ये एका व्यक्तीसाठी ₹२९,५५०, दोघांसाठी प्रत्येकी ₹१८,३५० आणि तिघांसाठी प्रत्येकी ₹१५,१५० तिकीट असेल. स्लीपर क्लासमध्ये एकासाठी ₹२६,३००, दोघांसाठी प्रत्येकी ₹१५,१०० आणि तिघांसाठी प्रत्येकी ₹११,९०० मोजावे लागतील. लहान मुलांसाठी बेड हवा असल्यास किंवा नको असल्यास त्यानुसार वेगळे दर आकारले जातील.
56
पॅकेजमध्ये काय-काय मोफत मिळेल?
या पॅकेजमध्ये तुम्हाला येण्या-जाण्याचं ट्रेन तिकीट (3AC किंवा स्लीपर) मिळेल. तसेच, फिरण्यासाठी शेअरिंग एसी गाडी, तिरुपती आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी १ रात्र डीलक्स हॉटेलमध्ये मुक्काम मिळेल. याशिवाय ठराविक वेळेचं जेवण, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि जीएसटीचाही यात समावेश आहे.
66
महत्त्वाचे नियम आणि कॅन्सलेशन पॉलिसी
प्रवासाच्या १५ दिवस आधी तिकीट रद्द केल्यास ₹२५० कापले जातील. ४ दिवसांपेक्षा कमी वेळ उरला असल्यास एकही रुपया परत मिळणार नाही. प्रवासात ओरिजिनल ओळखपत्र सोबत ठेवणं बंधनकारक आहे. ६५ वर्षांवरील नागरिकांसोबत एका तरुण व्यक्तीने असणं गरजेचं आहे. बुकिंग फक्त [www.irctctourism.com](https://www.irctctourism.com) या अधिकृत वेबसाईटवरूनच करता येईल.
Read more Photos on

Recommended Stories