असा इडली सांबार कधी खाल्लाय का? व्हायरल व्हिडीओला पाहून म्हणाल... (Watch Video)

Published : Jan 19, 2024, 07:01 PM ISTUpdated : Jan 19, 2024, 07:04 PM IST
Viral-video-of-idli-sambar-ice-cream

सार

प्रत्येकाला आइस्क्रिम खायला आवडते. आइस्क्रिम तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत, चव आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. सध्या आइस्क्रिम रोल्सचा ट्रेण्ड आहे. अशातच सोशल मीडियावर इडली सांबार आइस्क्रिमचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या वर्षातही अत्यंत विचित्र फूड कॉम्बिनेशनचे व्हिडीओ-फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. अशातच सध्या इडली सांबार आइस्क्रिम रोलचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

इडली सांबार आइस्क्रिम रोल
इंस्टाग्रामवर foodb_unk नावाच्या अकाउंटवरुन इडली सांबार आइस्क्रिम रोलचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती सर्वप्रथम इडली घेऊन त्याचे बारीक तुकडे करतो. यानंतर इडलीच्या तुकड्यांवर चटणी, सांबार आणि नंतर आइस्क्रिम टाकत सर्व गोष्टी एकत्रित करताना दिसतोय. खरंतर इडली सांबार आइस्क्रिम खाण्याचा कोणीही आजवर विचार देखील केला नसेल.

VIDEO : पाहा इडली सांबर आइस्क्रिम रोलचा व्हायरल झालेला व्हिडीओ 

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या इडली सांबार आइस्क्रिमचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सने या व्हिडीओला पाहून संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले की, “हे भगवान... मी आज हे काय पाहिलेय”, दुसऱ्याने म्हटले, “इडलीला न्याय द्यावा.”

याआधी देखील सोशल मीडियावर डोसा आइस्क्रिम ते रम आइस्क्रिमचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. पण खरंच अशाप्रकारचे फूड आवडीने खाल्ले जाते का? असा प्रश्न आजही बहुतांशजणांना पडला आहे.

आणखी वाचा : 

Jalebi Recipe : अयोध्येतील प्रसिद्ध जिलेबी तयार करा घरच्याघरी, पाहा ही सोपी रेसिपी

Coconut Kheer Recipe : प्रभू श्रीरामांना नैवेद्यासाठी बनवा नारळाची खीर, वाचा संपूर्ण रेसिपी सविस्तर

सोशल मीडियात व्हायरल होतोय Puni Puri Juiceचा व्हिडीओ, नेटकऱ्यांनी म्हटले.....

PREV

Recommended Stories

सोनं-चांदी सोडा, स्वस्तात खरेदी करा 6 फॅशनेबल आर्टिफिशियल इअररिंग्स
Mahaparinirvan Diwas 2025 निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाचा प्रेरणादायी विचार, आयुष्याला लावतील कलाटणी