बहुतांश महिलांना बाथरुममधील टाइल्स ते आरशावर टिकली लावल्यानंतर त्याला चिकटवण्याची सवय असते. अशातच टिकलीचे डाग राहतात. हेच डाग दूर करण्यासाठी सोपी ट्रिक वापरू शकता.
Tips to remove bindi glue : कपाळाला लावलेली टिकली महिलेचे सौंदर्य वाढवते. पण टिकली लावल्यानंतर बहुतांश महिला ती बाथरुममधील टाइल्स किंवा आरशावर चिकवटतात. यामुळे टिकलीचे डाग भितींवर किंवा आरशावर राहिले जातात. अशातच टिकलीचे डाग दूर करण्यासाठी बहुतांशजण साबण, क्लिनिंग प्रोडक्ट्स किंवा डिटर्जेंटचा वापर केला जातो. तरीही डाग दूर होत नसल्यास पुढील काही ट्रिक वापरू शकता.
टिकलीचे डाग असे करा दूर
बाथरुमचे स्वच्छता आपण वेळोवेळी करतो. पण बाथरुमच्या टाइल्सवरील टिकलीचे डाग दूर करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यासाठी महागड्या क्लिनिंग प्रोडक्ट्स घेऊनही काही होत नसल्यास 10 रुपयांच्या बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.
बेकिंग सोड्याचा असा करा वापर
बाथरुममधील टाइल्सवरील टिकलीचे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यामुळे टाइल्सवरील डाग दूर होतील. पण याचा वापर कसा करायचा याबद्दल पुढे जाणून घेऊया...
टिकलीचे डाग दूर करण्यासाठी सर्वप्रथम बाथरुमच्या टाइल्सवर पाणी शिंपडा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.