कपाट ते बाथरुममध्ये शिरलेला उंदीर जाईल पळून, करा हा खास उपाय

Published : Jan 01, 2025, 08:54 AM ISTUpdated : Jan 01, 2025, 08:55 AM IST
case of rats in jaipur

सार

घरात उंदीर शिरल्यानंतर त्याला पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. तरीही उंदीर घरातून जाण्याचे नाव घेत नाही. अशातच गव्हाच्या पीठाचा वापर करुन उंदरांना पळवण्याची ट्रिक वापरू शकता.

Home remedies to get rid of rats : घरात उंदीर आल्यानंतर नकोसे वाटते. खरंतर, उंदरांना मारण्याएवजी त्यांना पळवून लावण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला जातो. उंदीर घरात शिरल्यानंतर कपडेच नव्हे तर महत्वाचे कागदपत्रेही कुडतडतील याची भिती असते. याशिवाय उंदरांमुळे आरोग्यासंबंधित समस्याही उद्भवल्या जातात. अशातच घरातून उंदीर पळवण्यासाठी खास ट्रिक वापरू शकता.

उंदीर पळवण्यासाठी खास ट्रिक

घरातील उंदराला पळवून लावण्याची गव्हाच्या पीठाचे गोळे वापरू शकता. यासाठी गव्हाचे पीठ घट्ट मळून घ्या. यानंतर एका वाटीत तमालपत्र, चहा पावडर, बेकिंग सोडा आणि डिटेर्जेंट पावडर व्यवस्थितीत मिक्स करा. आता गव्हाच्या पीठाचे गोळे तयार करुन त्यामध्ये वाटीतील मिश्रण भरुन त्याचा पुन्हा एक गोळा तयार करा. अशाप्रकारे गव्हाच्या पीठाचे लहान आकाराचे गोळे तयार करून घेतल्यानंतर घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा. ही ट्रिक घरातील उंदीर पळवून लावण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

या वस्तूंचाही करू शकता वापर

  • घरातील उंदराला पळवून लावण्यासाठी गव्हाच्या पीठाच्या गोळ्यामध्ये तंबाखू, लाल मिरची आणि तूप मिक्स करुन त्याचे बॉल्स तयार करू शकता. हे बॉल्स घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात, खिडकीत किंवा बाथरुमच्या ठिकाणी ठेवून द्या.
  • उंदराला पळवून लावण्यासाठी लाल मिरची, तंबाखू, तमालपत्राशिवाय लसूण, पेपरमिंट किंवा निलगिरीच्या तेलाचाही वापर करू शकता. या सर्व गोष्टी एकत्रित करुन गव्हाच्या पीठात भरुन त्याचे गोळे करत घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा.

आणखी वाचा : 

न फाटेल, न तुटेल! या ट्रिकने घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाइल कॉर्न रोटी

हिंग बनावट आहे की नाही कसे ओळखावे? वाचा खास ट्रिक्स

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!