नात्यामध्ये प्रेम-भांडण होणे सामान्य बाब आहे. पण एखाद्या गोष्टीवरुन रागावलेल्या पार्टनरला शांत करण्यासाठी काय करावे याबद्दलच्या काही रोमँटिक टिप्स जाणून घेऊया...
Relationship Advice : नवरा-बायकोमध्ये भांडण होणे किंवा एकमेकांवर नाराज होणे या गोष्टी होत राहतात. पण पार्टनर एखाद्या गोष्टीवरुन रागावला किंवा नाराज झाला असेल तर काय करावे हे बहुतांश महिलांना कळत नाही. अशातच रागावलेल्या पार्टनरचा मूड ठिक करण्यासाठी काही रोमँटिक टिप्स वापरु शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
पार्टनरसोबत वाद झाल्यास किंवा नाराजाची स्थिती निर्माण झाल्यास त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा. यावेळी पार्टनरसोबत प्रेमाने बोला.
पार्टनरसोबत वाद झाल्यास त्याचे मन जिंकण्यासाठी त्याच्याजवळ जाऊन बोला. यावेळी पार्टनरवर तुमचे किती प्रेम आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करा. अशातच बोलताना पार्टनरला आय लव्ह यू बोलू शकता.
पार्टनर एखाद्या गोष्टीवरुन नाराज झाला असल्यास त्याची नाराजी दूर करण्यासाठी एक छानसे गिफ्ट घेऊन या. यामुळे पार्टनरचा राग शांत होईल. पार्टनरसाठी गजरा, फुल किंवा त्याच्या पसंतीचे एखादे गिफ्ट घेऊन या.
पार्टनर नाराज झाला असल्यास त्याचे मनं जिंकण्यासाठी शॉपिंगला घेऊन जा. यावेळी पार्टनरच्या पसंतीच्या गोष्टी खरेदी करा. असे केल्याने पार्टनरची नाराजी दूर होईल. याशिवाय पार्टनरसोबत रोमँटिक वेळ घालवण्याचाही प्रयत्न करा.
पार्टनर नाराज असल्यास त्याच्यासोबत रात्री झोपताना रोमँटिक बोला. पार्टनरजवळ जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे पार्टनरची नाराजी दूर होईल आणि एकमेकांवरील प्रेम अधिक वाढले जाईल.
आणखी वाचा :
Chanakya Niti: नवीन वर्षाची सुरुवात चाणक्यांच्या विचारांनी करा