Aadhaar Card: PVC आधार कार्ड काढायंच? जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची प्रक्रिया
PVC Aadhar Card : घरबसल्या पीव्हीसी आधार कार्डसाठी कसा करावा अर्ज? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती…
Chanda Mandavkar | Published : Dec 2, 2023 2:49 PM IST / Updated: Dec 04 2023, 05:53 PM IST
PVC Aadhar Card : ‘आधार कार्ड’ (pvc aadhar card) हे नागरिकांसाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक झाले आहे. त्यामुळे हे कार्ड घरीच विसरलात किंवा हरवले तर तुम्हालाच मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. याच समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागू नये, म्हणूनच ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’नं (UIDAI) PVC आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता एटीएम किंवा पॅन कार्डप्रमाणेच आधार कार्डही मिळणार आहे.
UIDAI या संकेतस्थळाच्या मदतीने पीव्हीसी आधार कार्डकरिता अर्ज कसा करावा? यासाठी किती रूपये खर्च करावे लागतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…
अर्ज कसा कराल?
UIDAIच्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ येथे भेट द्या
ऑनलाईन अर्ज असा पर्याय दाखवला जाईल
आधार कार्डवरील 12 अंकी क्रमांक येथे सबमिट करावा
येथे सिक्युरिट कोड अथवा कॅप्चा कोड सबमिट करावा
ओटीपी क्रमांकाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
आपल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल, तो क्रमांक तेथे सबमिट करावा
माय आधार (My Aadhaar) यावर क्लिक करून ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड (Order Aadhaar PVC Card) पर्याय निवडा
तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करा आणि नेक्स्ट (Next) पर्यायावर क्लिक करा
पेमेंटसाठी वेगवेगळे पर्याय दिसतील, आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडावा
50 रूपयांचा शुल्क भरावा लागेल
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत आधार कार्ड पोस्ट ऑफिसमध्ये पाठवले जाईल
पोस्ट ऑफिसद्वारे पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल.
या गोष्टी लक्षात ठेवा
पीव्हीसी आधार कार्डासाठी अर्ज करण्यापूर्वी आधार क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक योग्य असावा.
अर्ज प्रक्रियेपूर्वी कोणत्या माध्यमातून पेमेंट करणार आहात, हे ठरवावे.
पीव्हीसी कार्ड ट्रॅक करण्यासाठी आधार कार्ड आणि व्हर्च्युअल आयडी स्वतःसोबत ठेवावा.