Parenting Tips : मुलं उलट उत्तर देत असेल तर पालकांनी कशी शिस्त लावावी? वाचा खास टिप्स

Published : Aug 09, 2025, 04:09 PM IST

Parenting Tips : बहुतांश मुलं आपल्या आई-वडिलांसह घरी आलेल्या पाहुण्यांना देखील उलट बोलतात. खरंतर, ही सवय अत्यंत वाईट असून यामध्ये कसा बदल करता येईल यावर पालकांनी अधिक लक्ष द्यावे. याबद्दलच्याच काही खास टिप्स खाली जाणून घेऊया. 

PREV
14
मुलांमधील उलट बोलण्याची सवय

मुलं पालकांना उलट उत्तर देतात तेव्हा काही पालक संतप्त होतात. पण यामागे काही कारणे असू शकतात. अशा वेळी पालकांनी प्रथम शांत राहून परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. रागाने प्रतिक्रिया दिल्यास संवादाचा ताण वाढतो. त्यामुळे मुलाचं बोलणं पूर्ण ऐकून, त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. 

24
मुलांसाठी मर्यादा

पालकांनी मुलांना शिस्त लावताना स्पष्ट मर्यादा सांगाव्यात. “काय योग्य” आणि “काय अयोग्य” हे त्यांना नेमकं समजावून सांगणं गरजेचं आहे. घरात काही वागणुकीचे नियम असतील, तर ते सर्वांसाठी समान असावेत. उदा., बोलताना आवाज चढवू नये, अपमानास्पद शब्द वापरू नयेत इत्यादी. नियमांबरोबर त्यामागचं कारणही सांगावं, जेणेकरून मुलांना ते पाळण्याची गरज पटेल.

34
मुलांना विचार मांडण्यास वेळ द्या

मुलं उलट उत्तर देण्यामागे अनेकदा लक्ष वेधून घेण्याची गरज किंवा स्वातंत्र्य सिद्ध करण्याची भावना असते. अशा वेळी पालकांनी त्यांना योग्य मार्गाने मत व्यक्त करायला शिकवावं. उदा., “तुला असं वाटतंय का?” किंवा “तू हे दुसऱ्या पद्धतीने सांगू शकतोस का?” असे प्रश्न विचारून संवाद सौम्य ठेवता येतो. मुलांना आपले विचार आदराने मांडण्याचं कौशल्य हळूहळू शिकवलं पाहिजे.

44
पालकांनी स्वतः आदर्श निर्माण करावा

सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक स्वतः आदर्श निर्माण करावा. आपण जर मुलांसमोर एकमेकांशी किंवा मुलांशी सन्मानपूर्वक, संयमाने आणि आदराने बोललो, तर मुलंही तेच वर्तन आत्मसात करतात. शिस्त म्हणजे फक्त शिक्षा नाही, तर मार्गदर्शन, संयम आणि सततचा सकारात्मक संवाद असतो. अशा पद्धतीने मुलांच्या वागण्यात बदल घडवता येतो आणि घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहते.

Read more Photos on

Recommended Stories