How To Grow Cardamom Plant : वेलचीच्या रोपाची घरात कशी करावी लागवड? जाणून घ्या सोपी पद्धत

How To Grow Cardamom Plant : खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी वेलचीचा हमखास वापर केला जातो. इवल्याशा वेलचीची बाजारातील किंमतही खिशाला न परवडणारीच आहे. हा खर्च टाळण्यासाठी घरच्या घरीच वेलचीचे रोप लावले तर? चला तर मग जाणून घेऊया सोपी पद्धत…

 

Harshada Shirsekar | Published : Nov 17, 2023 6:57 AM IST / Updated: Nov 17 2023, 12:35 PM IST

14
पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्याची पद्धत

How To Grow Cardamom Plant In Marathi : धकाधकीच्या जीवनात हल्ली सर्वच जण आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळे नाश्ता, जेवणाच्या ताटामध्येही आरोग्यवर्धक-पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यावर भर दिला जातोय. 

कारण शरीर सुदृढ व निरोगी राहावे, यासाठी Health Conscious मंडळी आता कोणतीही प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थांचेच सेवन केले जाईल; याची काळजी घेताहेत. याचाच एक भाग म्हणून काही लोक घरच्या घरीच फळे-भाज्यांची लागवड करू लागले आहेत. शहरी भागात राहणारे लोकही घराच्या गॅलरीमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा इत्यादी फळ-भाज्या पिकवू लागले आहेत.

24
वेलचीची लागवड घरच्या घरी कशी करावी ?

तर मग मंडळींनो आता आपल्या होमगार्डनमध्ये आरोग्यवर्धक वेलचीचेही छोटेसे रोपटे नक्की लावा. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वेलचीचा हमखास वापर केला जातो. त्यामुळे बाजारातील महागडी वेलची किंवा वेलचीची पूड विकत घेण्याऐवजी घरच्या घरी वेलचीच्या रोपाची कशी लागवड करावी? जाणून घेऊया सोपी पद्धत.

34
वेलचीचे रोप लावण्याची पद्धत (How To Grow Cardamom Plant At Home)

वेलचीच्या रोपाच्या लागवडीसाठी लागणारी सामग्री : मातीची कुंडी, वेलचीचे बियाणे, माती आणि पाणी

  • सर्व प्रथम मातीच्या कुंडीमध्ये नारळाची किशी आणि खत एकत्रित करून माती टाकावी. 
  • आता वेलचीची बियाणे मिक्स करून माती व्यवस्थित दाबावी. कुंडीत थोडेसे पाणी ओतावे.
  • एकाच वेळेस खूप पाणी ओतू नये. माती सुकल्यानंतर आपण बियाणांना पाणी देऊ शकता.
  • जास्त पाणी दिल्यानेही बियाणे खराब होण्याची शक्यता असते.
  • थोड्या दिवसांनंतर बियाणांना अंकुर येऊन त्याचे रोपही तयार होईल.
  • योग्य पद्धतीने रोपाची देखभाल केल्यास तुम्हाला घरच्या घरीच कोणतीही केमिकलयुक्त खतांची फवारणी न केलेली वेलची मिळेल.
44
या गोष्टींची घ्या काळजी
  • रोपाला नियमित पाणी देणे आवश्यक.
  • पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी रोपाची कुंडी ठेवावी.
  • वेलचीच्या रोपाची उष्ण तापमानात जलदगतीने वाढ होते. पण म्हणून कडक उन्हात रोप ठेवू नये.

आणखी वाचा :

Fasting Benefits : उपवास करण्याचे हे आहेत 8 अद्भुत फायदे

सावधान! रात्रीच्या वेळेस केळे खाताय? आरोग्यास होतील हे अपाय

शारीरिक-मानसिक आरोग्य ठेवायचंय निरोगी? नियमित करा हा एकच सोपा व्यायाम

Share this Photo Gallery
Recommended Photos