शारीरिक व मानसिक आरोग्य ठेवायचंय निरोगी? तर मग नियमित करा पायऱ्या चढण्याचा व्यायाम
Lifestyle Nov 08 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
वजन नियंत्रणात राहते
शरीराचे वाढलेले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढण्याचा व्यायाम हा एक सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे शरीर मजबूतही होते.
Image credits: freepik
Marathi
शरीर होते मजबूत
शरीर मजबूत व्हावे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी; यासाठी नियमित पायऱ्या चढण्याचा व्यायाम करा. यामुळे संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीतपणे पार पडते.
Image credits: Getty
Marathi
हाडांसाठी लाभदायक
कमकुवत हाडांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर हा व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण या व्यायामामुळे बोन डेंसिटी वाढण्यास मदत मिळते.
Image credits: Getty
Marathi
चांगली झोप मिळते
निद्रानाशाच्या समस्येतून सुटका मिळवायची असेल तर आजच पायऱ्या चढण्याच्या व्यायामास सुरुवात करा. यामुळे चांगली झोप मिळू शकते.
Image credits: Getty
Marathi
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबाचीही समस्या या व्यायामामुळे नियंत्रणात राहू शकते. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच व्यायाम करावा.
Image credits: Getty
Marathi
मानसिक आरोग्य
महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत मिळते. शारीरिक तसंच मानसिक थकवा देखील दूर होतो.
Image credits: Getty
Marathi
कोलेस्ट्रॉल होते कमी
नियमित योग्य पद्धतीने पायऱ्या चढणे-उतरण्याचा व्यायाम केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढेल. ट्रायग्लिसराइडची पातळीही कमी होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.