Shivali Parab Diwali Look 2023 : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार शिवाली परबने सोशल मीडियावर आपला कातिल लुक शेअर करून धुरळा उडवून दिला आहे.
Harshada Shirsekar | Published : Nov 15, 2023 6:12 PM / Updated: Nov 15 2023, 06:22 PM IST
शिवाली परबच्या कातिल अदा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) या कॉमेडी शोमुळे कल्याणची चुलबुली (Kalyanchi Chulbuli) ‘शिवाली परब’ (Shivali Parab) घराघरांत पोहोचली आहे. शिवाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती आपले वेगवेगळ्या अवतारातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
दिवाळी सणातील स्पेशल लुक
दिवाळी (Diwali 2023) सणानिमित्तही शिवालीने खास लुक कॅरी करून आपले एकापेक्षा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिवाळी सणासाठी फिकट गुलाबी व क्रीम रंगाची साडी नेसली होती. साडीवर तिनं 'Maithili Channawar' या फॅशन डिझाइनरने डिझाइन केलेले बॅकलेस ब्लाऊज घातले आहे.
मिनिमल मेकअप
शिवालीने (Shivali Saree Look) साडीच्या रंगाप्रमाणेच सुंदर व सॉफ्ट टोन मेकअप केला होता. मिडल पार्टेड आंबाडा बांधून त्यावर गजरा माळला होता. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
आकर्षक दागिने
शिवारी परबने या सुंदर साडीवर मोठे ईअररिंग्ज, नाजूकशी माळ, नाकातील चमकी इतकेच दागिने घातले होते.
चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
अभिनेत्रीने पारंपरिक अवतारातील शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक व कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये ‘फायर’, ‘हार्ट’ असे इमोजी शेअर केले आहेत. तर काहींनी ‘सुंदर’ व ‘अति सुंदर’ अशाही कमेंट केल्या आहेत.
Video Credit Instagram @darajeebymaithili
शिवाली परबने शेअर केला सुंदर व्हिडीओ
शिवाली परबने (Shivali Parab) सुंदर व पारंपरिक लुक कॅमेऱ्यात अशा पद्धतीने केला कैद, पाहा VIDEO