Diwali 2023 : किचनमधील भांड्यांचा वापर करून साकारली सुंदर रांगोळी, VIDEO VIRAL

Published : Nov 14, 2023, 09:15 PM ISTUpdated : Nov 14, 2023, 09:24 PM IST

Diwali 2023 Rangoli Viral Video : स्वयंपाकघरातील लहान-मोठ्या भांड्यांचा वापर करून अनोख्या पद्धतीने रांगोळी काढल्याचा अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

PREV
15

Diwali Rangoli Viral Video : सोशल मीडियावर कधी कोणत्या प्रकारचे व्हिडीओ तसंच फोटो व्हायरल होतील, याचा काही नेम नाही. व्हायरल झालेले हे व्हिडीओ व फोटो काही मिनिटांतच लाखो-कोट्यवधी युजर्सपर्यंत पोहोचतात. 

याद्वारे आगळी-वेगळी कला दाखवून व्हिडीओ तयार करणाऱ्या क्रीएटर्सनाही खूप कमी वेळातच प्रसिद्ध मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दिवाळी सणादरम्यान एका तरुणीने अनोख्या पद्धतीने रांगोळी साकारल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

25

तरुणीने घरातील थाळी, ग्लास, वाटी, पेला, कढई अशा वेगवेगळ्या भांड्यांचा वापर करून अनोख्या पद्धतीने रांगोळी साकारली आहे.

35

सर्व प्रथम तिनं सर्व भांडी जमिनीवर पालथी ठेवली. मग त्यावर तिनं चाळणीच्या मदतीने जांभळा रंग भरला. 

45

यानंतर तिनं सर्व भांडी उचलली व रिकाम्या जागांवर वेगवेगळ्या रंगांचा वापर करून सुंदर डिझाइन काढले.  

Recommended Stories