Health Care : महिलांनो वयाच्या तिशीनंतर अशी घ्या आरोग्याची काळजी, रहाल फिट आणि हेल्दी

Published : May 15, 2024, 08:54 AM IST
Fitness and working mothers: Here are 5 ways to care for your health

सार

Health Care : वाढत्या वयासह शरिरातील हाडे ढिसूळ होण्यास सुरुवात होते. खरंतर, महिलांमध्ये हाडे ढिसूळ होण्याची समस्या अधिक दिसून येते. अशातच ओस्टियोपोरोसिससारख्या हाडांसंदर्भातील आजार मागे लागतात. यामुळे वयानुसार आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Health Care After Age of 30th : महिला ‘सुपर वुमन’ असतात असे नेहमीच म्हटले जाते. कारण घर, नवरा आणि मुलांना सांभाळण्यासह महिलेला स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागते. आजकाल प्रत्येक घरात दोन्ही पार्टनर नोकरी करणारे असतात. अशातच महिलांना घर आणि कामासह आरोग्य सांभाळणे थोडे कठीण होते. यामुळे वयाच्या तिशीनंतर महिलांनी आरोग्याची खास काळजी घेतली पाहिजे. यावेळी काही लहान गोष्टी लक्षात घेता तुम्ही हेल्दी आणि फिट राहू शकता.

शरिरातील हाडांच्या बळकटीसाठी…
वयाच्या तिशीनंतर पुरुष आणि महिलांमध्ये बोन मास्क डेंसिटी कमी होऊ लागते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये बोन मास्क कमी असते. यामुळे बहुतांश महिलांना ऑस्टियोपोरोसिस आजाराचा सामना करावा लागतो. याशिवाय वाढत्या वयासह गुडघे दुखीचा त्रासही महिलांना सहन करावा लागतो. यामुळे शरिरातील हाडांना बळकटी मिळण्यासाठी आपल्या खाण्यापिण्यात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा समावेश करावा. अंडी, दूध आणि पनीरसारख्या पदार्थांचे सेवन करावे. केळ्याचा शेक देखील पिऊ शकता.

दिवसभरातून 8-10 ग्लास पाणी प्या
महिलांनी एका दिवसात तीन ते चार लीटर पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. शरिराला हाइड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरिर डिटॉक्स होण्यासही मदत होते. एवढेच नव्हे त्वचा ग्लो होण्यासह पचनशक्ती मजबूत होते.

वयाच्या तिशीनंतर अ‍ॅक्टिव्ह राहा
एका विशिष्ट वयानंतर महिलांचे वजन वेगाने वाढण्यास सुरुवात होते. यामुळे महिलांनी वजन नियंत्रित ठेवण्याकडे लक्ष द्यावे. सकाळी अथवा संध्याकाळी चालण्यासाठी जावे. दररोज दिवसातून अर्धा तास तरी व्यायाम करावा. जेणेकरुन वयाच्या तिशीनंतर अ‍ॅक्टिव्ह राहू शकता.

त्वचेची काळजी घ्या
महिलांना आपल्या सौंदर्यावर खूप प्रेम असते. वयाच्या तिशीनंतर त्वचेत फार बदल होण्यास सुरुवात होते. अशातच त्वचेची खास काळजी घ्यावी. आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महिलांनी उत्तम स्किन केअर रुटीन फॉलो करावे. स्किन केअर रुटीनमध्ये क्लिजिंग, स्क्रबिंग आणि टोनिंगची गरज भासते. घराबाहेर पडताना सनस्क्रिनचा आवश्यक वापर करावा. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन देखील करावे.

या गोष्टींपासून रहा दूर
स्वत:ला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी महिलांनी जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर रहावे. यामध्ये अत्याधिक प्रमाणात तेलाचा समावेश असतो. यामुळे शरिरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले जाऊ शकते. याशिवाय शरिरातील मेटाबॉलिज्म बिघडण्यासह त्वचेसंबंधित समस्याही उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त महिलांनी योग्य डाएट, व्यायाम अशा काही गोष्टींकडे आवर्जुन लक्ष दिले पाहिजे.

आणखी वाचा : 

फेशिअलही विसराल, ग्लोइंग त्वचेसाठी बेसन पीठात मिक्स करा या 7 वस्तू

ना अधिक डाएट आणि जिम...घरच्याघरी राहून करा ही 6 कामे, वजन होईल कमी

PREV

Recommended Stories

फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!
घरीच पिकवा, ताजी खा! हिवाळ्यात कमी कष्टात आणि कमी जागेत येणाऱ्या 'या' ७ सुपर हेल्दी भाज्या!