रात्रीच्या वेळेस केस विंचरुन झोपावे की नाही? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ

Hair Care : केस विंचरणे हे केसांची काळजी घेण्यापैकी एक महत्त्वाचे काम आहे. असे केल्याने केसांना अनेक फायदे होतात. अशातच बहुतांशजणांना प्रश्न पडतो की, रात्रीच्या वेळेस केस विंचरुन झोपावे की नाही? याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया सविस्तर...

Hair Care Tips : उन्हाळ्याच्या दिवसात केस कोरडी होण्याची समस्या बहुतांशजणांना निर्माण होते. यामागील कारण म्हणजे, कडाक्याचे ऊन आणि गरम वातावरणाची स्थिती. यादरम्यान, केसांमध्ये सातत्याने ओलावा निर्माण होत असल्यास काही समस्या उद्भवू शकतात. यामुळे केसांसाठी हेअर मास्क, ऑइयलिंग किंवा दुसऱ्या ट्रिक्सचा वापर केला पाहिजे. यामधीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केस विंचरणे. केस विंचरल्याने ब्लड सर्कुलेशन वाढते आणि केसांच्या मूळांना चिकटलेली माती, धूळ आणि घाण निघण्यास मदत होते. जाणून घेऊया रात्रीच्या वेळेस झोपण्यापूर्वी केस विंचरुन झोपावे की नाही?

रात्रीच्या वेळेस केस विंचरणे
रात्रीच्या वेळेस केसांना तेल लावून झोपू नये. कारण केसांमध्ये अडकलेली माती, धूळ तशीच रात्रभर राहू शकते. यामुळेच रात्रीच्या वेळेस केस विंचरुन झोपावे. याशिवाय रात्री झोपण्याआधी केस विंचरल्याने काय फायदे होतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

रात्री केस विंचरण्याचे फायदे पुढीलप्रमाणे :

ब्लड सर्कुलेशन सुधारते
केसांची चमक आणि सुंदरता कायम टिकून राहण्यासाठी केसांची मूळ हेल्दी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. केसांच्या मूळांजवळ ब्लड सर्कुलेशन व्यवस्थिती होत नसल्यास केस गळतीची समस्या वाढू शकते. केसांना तेल लावण्यासह केस विंचरल्यानेही मूळांपर्यंत ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते. अशातच केस वाढण्यासह मजबूत होण्यास मदत होते.

केसांमधील नैसर्गिक तेलाचा फायदा
केस व्यवस्थितीत विंचरल्यास त्यामध्ये असणारे नैसर्गिक तेल सर्वत्र व्यवस्थितीत पसरले जाते. हे तेल केसांची मूळ आणि केसांमध्ये पोहोचल्याने केस वाढण्यास सुरुवात होते. याशिवाय केसांना चमक येते.

केसांचे तुटणे कमी होते
बहुतांशजणांना वाटते की, रात्रीच्या वेळेस केस विंचरुन झोपल्यास केस तुटता. खरंतर, केस विंचरल्याने केसांमधील गुंता सुटतो. अशातच केस तुटण्याची शक्यता फार कमी होते.

तणाव कमी होतो
रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरुन झोपल्यास तणाव कमी होतो. उत्तम झोप लागते आणि यामुळेच दिवसभर तुम्ही फ्रेश राहता. याशिवाय केस विंचरल्याने मानसिक तणावही कमी होतो.

केसांची चमक वाढते
रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने केसांची चमक वाढते असे तज्ज्ञ सांगतात. केसांमध्ये गुंता वाढला असल्यास तो न सोडवता झोपल्याने केसांची चमक कमी होऊ शकते. व्यवस्थितीत केस विंचरुन झोपल्याने अनेक फायदे होतातच. पण केसांची चमक दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

झोपताना पलंगाखाली ठेवा या 8 गोष्टी, आयुष्यात होईल पैशांची भरभराट

केसांना कलर केलाय? रंग दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी खास 5 टिप्स

Share this article