फेस ऑइल कंट्रोलसाठी दोन मोठे चमचे बेसस, लिंबूचा रस घेऊन एक पेस्ट तयार केला. पेस्ट चेहऱ्याला 15-20 मिनिटे लावून झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
त्वचेच्या मॉइश्चराइजिंगसाठी बेसन आणि मधाचा पॅक तयार करा. पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा पॅक चेहऱ्याला लावू शकता.
डीप स्किन क्लिनिंगसाठी मुल्तानी माती आणि बेसनचे पीठ घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा. यानंतर चेहऱ्याला 15 मिनिटे पॅक लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवा
त्वचेवरील टॅनिंग हटवण्यासाठी बेसन आणि टोमॅटोचा फेस पॅक बेस्ट पर्याय आहे. घरच्याघरी फेस पॅक वापरुन त्वचेची काळजी घेऊ शकता.
एका वाटीत दोन चमचे बेसन व दोन चमचे काकडीचा रस, गुलाब पाणी मिक्स करा. फेस पॅक चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
एका वाटीत दोन चमचे बेसन व एक चमचा दही मिक्स करुन पेस्ट तयार करा. पेस्ट चेहरा आणि मानेला 15 मिनिटे लावून धुवा. यामुळे त्वचा हाइड्रेट होण्यास मदत होईल.
एका वाटीत दोन चमचे बेसन आणि दीड चमचा हळद पावडर व गुलाब पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा ग्लो होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.