ना अधिक डाएट आणि जिम...घरच्याघरी राहून करा ही 6 कामे, वजन होईल कमी

Published : May 14, 2024, 10:37 AM ISTUpdated : May 14, 2024, 10:39 AM IST
Summer weight loss

सार

Weight Loss : सध्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला जिमला जाऊन व्यायाम करणे शक्य नसते. अशातच वजन वाढले जाते. काहीजण अशीही असतात जे दररोज स्ट्रिक्ट डाएट आणि जिमचा आधार घेतात, तरीही वजन कमी होत नाही. घरच्याघरी कसे वजन कमी करायचे याबद्दल जाणून घेऊया.

Weight Loss Tips :  सकाळी उठल्यानंतर घरातील कामे, ऑफिसला जाण्याची धावपळ अशा सर्व गोष्टींमुळे आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत येत नाही. याशिवाय ऑफिसमध्ये सातत्याने बसून राहिल्याने आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. अशातच बहुतांशजण वाढलेले वजन कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट आणि जिममध्ये जाऊन हेव्ही वर्कआउट करतात. पण तरीही वजन कमी होत नाही. यासाठी तुम्ही घरच्याघरी पुढील काही कामे केल्यास नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या
सकाळी उठल्यानंतर चहा एवजी कोमट गरम पामी प्यावे. यामुळे शरिरातील मेटाबॉलिज्मचा स्तर सुधारला जातो. याशिवाय सकाळी पाणी प्यायल्यानंतर शरिरातील विषाक्त तत्त्वे बाहेर पडण्यास मदत होते. दिवसभर हाइड्रेट राहण्यासाठीही पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो.

व्यायाम करा
दररोज सकाळी उठल्यानंतर हलक्या स्वरुपाचा व्यायाम करु शकता. योगासने किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइज सकाळच्या वेळेस करु शकता. यामुळे स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होईल. घरी व्यायाम करणे शक्य नसल्यास सकाळी चालण्यासाठी जावे.

साखर आणि मीठाचे सेवन कमी करा
दिवसभर तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर बंद करा. यामुळे वजन वाढले जाईल. चिप्स, गोड पदार्थ किंवा पाकिट बंद पदार्थ खाणे टाळा. वजन कमी करायचे असल्यास साखर आणि मीठाचे सेवन करणे देखील कमी करावे.

घरी तयार केलेले अन्नपदार्थ खा
सातत्याने हॉटेल किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशातच लठ्ठपणा, वजन वाढू शकते. घरच्याघरी तयार केलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहिल. याशिवाय आरोग्य देखील हेल्दी राहिल.

डाएटमध्ये फायबरचे प्रमाण वाढवा
डाएटमध्ये सॅलड, सूप आणि भाज्यांचे अत्याधिक सेवन करा. रात्रीच्या वेळेस चपाती, भात याचे सेवन करणे टाळा. हलक्या स्वरुपाचे जेवण करा. यासाठी रात्री सॅलड, मोड आलेल्या कडाधान्यांचे सॅलड अथवा सूप पिऊ शकता. नाश्त्यालाही ज्यूस किंवा फळांचे सेवन करा. मद्यपान करणे टाळा. तरच वजन कमी होण्यास मदत होईल.

खाल्ल्यानंतर शतपावली करा
जेवल्यानंतर शतपावली केल्यास खाल्लेले पदार्थ पचण्यास मदत होईल. याशिवाय कॅलरीजही बर्न होतील. खाल्ल्यानंतर शतपावली केल्याने रक्तातील ग्लुकोजचा स्तर कमी होतो.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

रात्रीच्या वेळेस केस विंचरुन झोपावे की नाही? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ

दररोज मूठभर मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, रहाल हेल्दी आणि फिट

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!