तुमची आई, पत्नी, एखादी मैत्रीण जी तुमच्या पाठीशी नेहमी 'सुपर वुमन' म्हणून उभी राहते तिला यंदाच्या महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा नक्की द्या.
Happy Women's Day 2024 Wishes : जगभरात प्रत्येक वर्षी 8 मार्चला ‘जागतिक महिला दिवस’ साजरा केला जातो. खरंतर, महिलांना त्यांच्या मुलभूत हक्कांप्रति जागृक करण्यासाठी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. महिला दिवसानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या महिलादिनिमित्त तुम्ही तुमची आई, पत्नी, बहिण किंवा मैत्रिणीला खास मेसेज पाठवून द्या शुभेच्छा.
ती आई आहे, ती एक मुलगी आहे बहिण आहे ती, पत्नीही ही आहे आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खात तिचा सहभाग आहे अशा सुपर वुमनला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे तू उभी आहेस म्हणूनच आज मी आयुष्यात यशस्वी आहे माझ्या आयुष्यातील धाडसी महिलेला Happy Women's Day!
पाठीचा कणा आहेस तू माझा आयुष्यात कोणत्याही मार्गावर डगमगलो तरीही तू सावरशील मला हाच विश्वास आहे तुझ्यावर मला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमच्या घराचा आधारवड आहेस तू तुझ्या कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतील अशी आहेस तू तुझ्याच पाठिंब्यामुळे आयुष्यातील वळणांवरील संकटेही लहान वाटतात मला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक सुख-दु:खात तुझी साथ मला उंच झेप घेण्यास मदत करते अशीच आयुष्यभर माझ्यासोबत राहा Happy Women's Day!
तुझ्याशिवाय घर आहे अपूर्ण कारण तुझ्यामुळेच आमचे आयुष्य होते पूर्ण जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक आव्हानांना खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या प्रिय आईला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
'ती' शब्द एकच असला तरीही त्याचा अर्थ फार मोठा आहे कारण तिच्यामुळेच आमचे आयुष्य सुंदर आहे Happy Women's Day!
तू नेहमी हसत रहा, आनंदी रहा हिच देवाकडे प्रार्थना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“एक नारी सब पे भारी” महिला दिनानिमित्त माझ्या आईला, पत्नीला आणि आयुष्यातील प्रत्येक 'ती' ला हार्दिक शुभेच्छा!