Stroke In Youth : तरुणांमध्येही वाढतोय स्ट्रोकचा धोका, ही लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा

Published : Sep 12, 2026, 01:45 PM IST

पूर्वी स्ट्रोक फक्त वयस्कर लोकांनाच होतो, असा एक समज होता. पण आता तो काळ राहिला नाही. आजकाल तरुणांमध्येही स्ट्रोकचं प्रमाण वाढताना दिसतंय.

PREV
17
तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका
पूर्वी स्ट्रोक हा फक्त वयस्कर लोकांचा आजार मानला जायचा, पण आता परिस्थिती बदलली आहे. तरुणांमध्येही स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. जर रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर शरीराची एक बाजू पूर्णपणे निकामी होऊ शकते.
27
स्ट्रोकचे संकेत
स्ट्रोक येण्यापूर्वी आपलं शरीर काही संकेत देतं. ही लक्षणं दिसल्यास रुग्णाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्या. मेंदूच्या एखाद्या भागात रक्तपुरवठा थांबल्यास किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव झाल्यास स्ट्रोक येतो.
37
स्ट्रोक आल्यानंतर काय होते?
स्ट्रोक आल्यावर काही मिनिटांतच मेंदूच्या पेशी खराब होऊ लागतात. त्यामुळे त्याची लक्षणं पटकन ओळखणं गरजेचं आहे. तरुणांमध्ये स्ट्रोक येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे वाढलेले लाईफस्टाईल डिसीजेस (जीवनशैलीशी संबंधित आजार).
47
कशामुळे येतो?
उच्च रक्तदाब (High BP), मधुमेह (Diabetes), अतिरिक्त वजन, धूम्रपान, हाय कोलेस्ट्रॉल आणि काही हृदयरोग स्ट्रोकचा धोका वाढवतात. काही तरुणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील दोष यांसारखी दुर्मिळ कारणंही असू शकतात.
57
लक्षणे
कोणत्याही कारणाशिवाय अचानक तीव्र डोकेदुखी, चालायला त्रास होणं, अचानक दृष्टी कमी होणं किंवा चक्कर येणं ही स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. अनेक तरुण रुग्ण या लक्षणांना मायग्रेन, थकवा किंवा डिहायड्रेशन समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.
67
अन्य लक्षणे
चेहऱ्याचा एक भाग वाकडा होऊ शकतो किंवा सुन्न झाल्यासारखं वाटू शकतं. तज्ज्ञांच्या मते, हे देखील स्ट्रोकचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. अचानक अशक्तपणा किंवा बधिरपणा जाणवणं, विशेषतः शरीराच्या एका बाजूला, हे सुद्धा स्ट्रोकचं लक्षण आहे.
77
काय करावे?
अचानक दृष्टी अंधुक होणं हे आणखी एक लक्षण आहे. अनेकजण याला शुगर कमी झाल्याचं किंवा प्रेशर वाढल्याचं लक्षण समजून दुर्लक्ष करतात. पण कोणताही गैरसमज न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचानक चालताना त्रास होणे, जास्त घाम येणे, थकवा, तोल जाणे आणि मनाप्रमाणे हालचाल करता न येणे, ही सर्व स्ट्रोकची प्राथमिक लक्षणं आहेत.
Read more Photos on

Recommended Stories