Fever Bathing : ताप आल्यावर अंघोळ करावी का? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Published : Sep 11, 2026, 08:07 PM IST

ताप आल्यावर अंघोळ करू नये, असा एक सर्वसाधारण समज आहे. पण, तुमच्या शारीरिक स्थितीनुसार तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ करू शकता. खूप गरम किंवा थंड पाणी टाळावं आणि विश्रांती व शरीर हायड्रेटेड ठेवण्याला जास्त महत्त्व द्यावं.

PREV
15
तापात अंघोळ करावी का?

मुंबई : तुम्हाला हलका ताप असेल आणि तुमची प्रकृती स्थिर असेल, तर कोमट पाण्याने अंघोळ करणं साधारणपणे सुरक्षित मानलं जातं. यामुळे शरीर स्वच्छ राहतं आणि अस्वस्थताही कमी होते. पण अंघोळीमुळे तापाचं मूळ कारण दूर होईल, असं समजू नका.

25
गरम पाणी टाळा
ताप असताना जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचं तापमान आणखी वाढू शकतं. तापात डिहायड्रेशनचा धोका असतो, त्यात गरम पाण्यामुळे अस्वस्थता वाढते. त्यामुळे खूप गरम पाणी वापरणं टाळलेलंच बरं.
35
थंड पाणी वापरणं टाळा
ताप कमी करण्यासाठी खूप थंड पाणी वापरणं योग्य नाही. अचानक थंड पाण्यामुळे शरीरात हुडहुडी भरू शकते, ज्यामुळे तुम्हाला आणखी त्रास होऊ शकतो. त्यामुळे शरीराला धक्का बसेल इतकं थंड पाणी वापरणं टाळा.
45
शरीराला आराम द्या
ताप आलेला असताना पुरेशी विश्रांती घेणं आणि शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी, सूप यांसारखे द्रव पदार्थ भरपूर प्या. हलका आहार घ्या आणि शरीराला थकवणाऱ्या गोष्टी करणं टाळा.
55
जास्त वेळ पाण्यात थांबू नका
ताप असताना अंघोळ करायचीच असेल, तर जास्त वेळ करू नका. कोमट पाण्याचा वापर करा आणि अंघोळीनंतर शरीर व्यवस्थित कोरडं करा. तुम्हाला खूप थकवा किंवा चक्कर येत असेल, तर एकट्याने अंघोळ करणं टाळा.
Read more Photos on

Recommended Stories