बहिणीने टिळा लावल्यास कसे वाढते भावाचे भाग्य?
कार्तिक महिन्यात भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.
भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला टिळा लावल्यास त्याचा भाग्योदय होतो व आयुष्यातील समस्या कमी होतात, असे म्हणतात. जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती...
टिळा लावण्यासाठी कुंकवाचा उपयोग केला जातो. कुंकू हे सूर्याशी संबंधित आहे. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे जीवनात प्रगती व सुख-समृद्धी वाढते. यामुळे कुंकू अतिशय पवित्र मानले जाते.
टिळा लावल्यानंतर कपाळावर अक्षताही लावल्याची परंपरा आहे, ज्या शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत. शुक्र ग्रह धनसंपत्तीचा कारक आहे. यामुळेच प्रत्येक शुभ कार्यात अक्षतेचे समावेश केला जातो.
जेव्हा बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावून अक्षता लावते. त्यावेळेस सूर्य व शुक्र दोन्ही ग्रहांच्या शुभ फळांची भावाला प्राप्ती होते. ज्यामुळे त्याचे भाग्य उजळण्यास मदत मिळू शकते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.