Threads Big Update : इंस्टाग्रामला गुडबाय न म्हणता आता थेट डिलीट करू शकता Threads Account

Threads Delete : इंस्टाग्राम अकाउंटला गुडबाय न करताही आता आपण थ्रेड्स अकाउंट थेट डिलीट करू शकता. 

Harshada Shirsekar | Published : Nov 14, 2023 7:35 PM / Updated: Nov 14 2023, 08:03 PM IST
15
आता थ्रेड्स डिलीट करणे शक्य

लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘Twitter’ आताचे ‘X’ ला तगडी टक्कर देण्यासाठी मेटाने ‘थ्रेड्स’ (Threads) हे नवीन अ‍ॅप काही महिन्यांपूर्वी लाँच केले होते. नवीन अ‍ॅप लाँच होताच लाखो युजर्संनी रातोरात ते डाऊनलोड केले आणि सर्वत्र ‘थ्रेड्स’चीच चर्चा सुरू झाली. पण ही चर्चा फार काळ टिकली नाही. कारण युजर्संकडून या अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कारण खूप कमी युजर्स थ्रेड्सचा वापर करताहेत.

25
थ्रेड्सचे प्रमोशन ठरले फेल

‘Threads’चे प्रमोशन करण्यासाठी मेटाकडून शक्य असलेले सर्व प्रयत्न केले जात आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या टाइमलाइनवरही ‘Threads’ चे नोटिफिकेशन दाखवले जात आहे. थ्रेड्सशी संबंधित अपडेट्स या प्लॅटफॉर्मवर दिसावते, यासाठी युजर्संकडून कोणत्याही प्रकारे परवानगीही घेण्यात आलेली नाही.

35
सुरुवातीला डिलीटचा पर्याय उपलब्ध नव्हता

सुरुवातीला Threads अकाउंट डिलीट करण्यासाठी कोणताही पर्याय देण्यात आला नव्हता. Threads डिलीट केले तर इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलीट होणार होते. कारण हे अ‍ॅप थेट इंस्टाग्राम अकाउंटद्वारे Log In करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे एकूणच सोशल मीडियावरील युजर्सची मोठी पंचाईतच झाली होती.

45
आता सहज डिलीट करू शकता Threads

पण आता ‘मेटा’ने (Meta) Threads अकाउंट डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इंस्टाग्राम कंपनीचे सीईओ एडम मोसेरी यांनी आपल्या एका पोस्टद्वारे याबद्दलची माहिती युजर्संसोबत शेअर केली होती. ‘लवकरच आपण इंस्टाग्राम अकाउंट डिलीट न करताही आपले Threads अकाउंट डिलीट करू शकता’, अशी माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिली होती.

55
Threads अकाउंट कसे डिलीट करावे?

नवीन अपडेटनुसार ‘Threads’ अकाउंट डिलीट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • यासाठी ‘Threads’ प्रोफाइल क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Setting’ पर्यायावर क्लिक करा.
  • तेथील 'Account' या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला ‘Deactivate’ आणि ‘Delete’ असे दोन पर्याय दिसतील.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे आणखी दोन पर्याय दिसतील
  1. Deactivating Your Profile Is Temporary

2. Deleting Your Profile Is Permanent

  • यापैकी आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडून आपण ‘Threads’ अकाउंट तात्पुरते किंवा कायमस्वरुपी डिलीट करू शकता.

आणखी वाचा :

सावधान! रात्रीच्या वेळेस केळे खाताय? आरोग्यास होतील हे अपाय

Hair Growth Tips : केसगळतीपासून ते कोंड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, केसांसाठी वापरा ही हिरवीगार पाने

VIDEO कोयता किंवा मशीनचा वापर न करता कसा फोडावा नारळ? पाहा सोपी पद्धत

Share this Photo Gallery
Recommended Photos