धनत्रयोदशीला करा झाडूचे हे 5 उपाय, होईल धनलाभ

भारतात धनत्रयोदशीवेळी झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीला घरी झाडू खरेदी केल्याने आर्थिक स्थिती सुधारली जाते असे म्हटले जाते. धनत्रयोदशीला झाडूचे कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Dhanteras 2024 Jhadu Upay : हिंदू धर्मात दिव्यांचा सण असणाऱ्या दिवाळीला फार मोठे महत्व आहे. दिवाळीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. या दिवसी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्यास घरात सुख-समृद्धी येते. याच कारणास्तव धनत्रयोदशीच्या दिवशी काही खास उपाय करुन धनलाभ होऊ शकतो.

पहिला उपाय
धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून नवी झाडू खरेदी करा. ही झाडू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. असे म्हटले जाते की, हा उपाय केल्याने घरात सुख-शांती टिकून राहते. याशिवाय घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.

दुसरा उपाय
धनत्रयोदशीला नवी झाडू खरेदी केल्यानंतर जुनी झाडू अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणाला मिळणार नाही. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. याशिवाय बिघडलेली कामे पूर्ण होतात.

तिसरा उपाय
धनत्रयोदशीच्या दिवशी नवी झाडू खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. यासाठी धनत्रयोदशीला सोने, चांदी अथवा तांब्यापासून तयार केलेली झाडू देवी लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर झाडू लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम सोबत राहतो.

चौथा उपाय
नवी झाडू खरेदी केल्यानंतर लगेच जुनी झाडू फेकून देऊ नका. असे करणे अशुभ मानले जाते. जुनी झाडू नेहमीच होळी, अमावस्या अथवा शनिवारच्या दिवशी फेकून द्यावी.

पाचवा उपाय
धनत्रयोदशीला सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घरात कचरा काढावा. असे करणे शुभ मानले जाते. कचरा काढल्यानंतर घरात गंगाजल छिंपडून कापूर पेटवून झाडूवरुन वरती-खाली फिरवा. या उपायाने घरातील एखादा आजारी व्यक्ती लवकर बरा होतो असे मानले जाते. 

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Diwali 2024 वेळी घराला सजावट करण्यासाठी 8 Ideas, पाहुणे होतील खुश

दिवाळीआधी घरी लावा हे रोप, होईल धनवर्षाव

Read more Articles on
Share this article