ऐश्वर्या रायच्या फॅमिली फंक्शनला अभिषेक बच्चन आला नाही? कारण काय वाचा

Published : Oct 24, 2024, 09:18 AM ISTUpdated : Oct 24, 2024, 09:19 AM IST
Abhishek Bachchan

सार

ऐश्वर्या रायच्या चुलत बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला अभिषेक बच्चन आला नसल्याचे दिसून आले. यामुळे दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चांनी वेग धरला. खरंतर, अभिषेक बच्चनला त्याची आजी इंदिरा भादुडीला भेटण्यासाठी भोपाळला जायचे होते.

Entertainment News : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामधील घटस्फोटाच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. अशातच काही बातम्यांमध्ये असे सांगितले जाते की, दोघांमध्ये सर्वकाही ठिक आहे. पण अचानक असे काही होते की, पुन्हा घटस्फोटाच्या चर्चांना उधाण येते. खरंतर, ऐश्वर्या रायच्या चुलत बहिणीचा वाढदिवस होता. यानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला अभिषेक बच्चन दिसला नाही. यामुळे ऐश्वर्या राय आणि अभिषेकमधील घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या. मात्र अभिषेक बच्चन बर्थडे पार्टीला का आला नाही याचे कारण वेगळेच आहे. याबद्दलच जाणून घेऊया...

अभिषेक बच्चनच्या आजीची बिघडली प्रकृती
ऐश्वर्या रायच्या चुलत बहिणीची बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अभिषेक बच्चन दिसला नाही. अशातच पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यावरुन प्रश्न उपस्थितीत केले जाऊ लागते. अभिषेक बच्चन पार्टीला न आल्याचे कारण एका जवळच्या सूत्राने सांगितले. सूत्राने म्हटले की, अभिषेक बच्चन त्याची आजी इंदिरा भादुडीकडे आहे. तिची अभिषेक बच्चन काळजी घेत आहे. याआधी अशी बातमी आली होती की, इंदिरा भादुडी यांचे निधन झाले होते. मात्र खरी गोष्ट अशी की, इंदिरा यांच्या पाठीच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच सर्व कारण्यास्तव अभिषेक बच्चन भोपाळला गेला आहे. यामुळेच ऐश्वर्याच्या चुलत बहिणीच्या पार्टीला अभिषेक आला नाही.

अभिषेक बच्चनच्या आजीची हेल्थ अपडेट
इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, इंदिरा भादुडी यांच्या आरोग्याबद्दल केअर टेकरने माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, इंदिरा भादुडी यांची प्रकृती ठिक आहे. इंदिरा यांच्या पाठीच्या हाडाला दुखापत झाली आहे. यामुळेच इंदिरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या माहितीनंतर चाहत्यांकडून अभिषेक बच्चनच्या आजीची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे. याशिवाय काहींनी अभिषेक वाढदिवसाला अनुपस्थितीत राहिल्याच्या कारणाला पाठिंबा देखील दिला आहे.

इंदिरा भादुडी यांचे वय
अभिषेक बच्चन याची आजी इंदिरा भादुडी 94 वर्षांच्या आहेत. त्या भोपाळमध्ये एकट्या राहतात. इंदिरा यांची काळजी घेण्यासाठी एक केअर टेकर सतत त्यांच्यासोबत असते. अधिक वय झाल्याने इंदिरा यांना आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतोय.

आणखी वाचा : 

वयाच्या पंन्नाशीतही दिसते तरुणी, वाचा Malaika Arora चा डाएट प्लॅन

सलमान खान लॉरेन्स बिश्नोईची माफी का मागत नाहीये? वडिलांनी सांगतिले मोठे कारण

PREV

Recommended Stories

Festival Calendar 2026 : पुढील वर्षात होळी, दसरा, दिवाळी कधी? नोट करा तारीख
प्रत्येक महिलेकडे असावी ही 6 Hair Accessories, लग्नसोहळ्यात वापराल