चष्मापासून होईल सुटका, करा हे 5 घरगुती आयुर्वेदिक उपाय

चष्मा वापरणे बंद करायचे असल्यास आयुर्वेदात सांगितलेले काही उपाय करू शकता. यामुळे कालांतराने डोळ्यांवर चष्मा लावण्याची गरज भासणार नाही. जाणून घेऊया कोणत्या आयुर्वेदिक उपायांनी चष्मापासून सुटका मिळवू शकता.

Chanda Mandavkar | Published : Oct 24, 2024 3:09 AM IST

Ayurveda Remedy for Eyes Health : सध्याच्या घडीला लहान मुलांना चष्मा लागला जातो. या उलट आपल्या आजी-आजोबांच्या काळातील बहुतांशजणांना वयाच्या पंन्नाशीनंतर चष्मा लागला जात होता. पण आज ताण, बिघडलेली लाइफस्टाइल, आपली खाण्यापिण्याची बदललेली पद्धत अशा काही गोष्टींचा आरोग्यावर परिणाम झालेला दिसतो. अशातच सातत्याने मोबाईल, कंप्युटरवर काम करुन करुनही डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळ्यांना चष्मा लावण्याची गरज भासते. खरंतर, स्क्रिनच्या प्रकाशाचा आपल्या डोळ्यांवर प्रभाव पडला जातो. जाणून घेऊया डोळ्यांवरील चष्मा दूर करण्यासाठी आयुर्वेदातील कोणते उपाय करावे याबद्दल सविस्तर...

त्रिफळाचे सेवन
आयुर्वेदात डोळ्यांसाठी त्रिफळाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले आहे. यामध्ये आवळा, हरडा आणि बेहडाचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार, त्रिफळाची पावडर रात्री झोपण्याआधी भिजवून ठेवून सकाळी उपाशी पोटी गाळून प्यावी. यामुळे डोळ्यांना हळूहळू स्पष्टपणे दिसण्यास सुरुवात होऊ शकते. याशिवाय बॉडी डिटॉक्स होण्यासही मदत होते.

बडीशेप, बदाम आणि खडीसाखरचे मिश्रण
आयुर्वेदानुसार, बडीशेप, बदाम आणि खडीसारखेचे मिश्रण डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म डोळ्यांच्या स्नायूंसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. याशिवाय बदामामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए आणि काही मिनिरल्स असतात.

डोळे स्वच्छ ठेवा
चष्मापासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदानुसार, दररोज सकाळी उठल्यानंतर तोंडात पाणी भरुन ठेवावे आणि पाण्याने डोळे धुवावेत. असे केल्याने डोळे स्वच्छ होतात.

डोळ्यांची एक्सरसाइज करा
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज थोडावेळ डोळ्यांची एक्सरसाइज करा. यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होईल.

डोळ्यांना आराम द्या
आपल्या डेली रुटीनमध्ये थोडा बदल केल्यानंतर काही प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. अशातच सतत स्क्रिन समोर बसून काम करत असाल तर थोडावेळ स्क्रिनपासून दूर राहा. डोळ्यांना आराम द्या. याशिवाय कडक उन्हात जाण्यास टाळा.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

थंडीत केसांत होणाऱ्या कोंड्याच्या समस्येवर उपाय, आठवड्यात दिसेल फरक

आठवड्याभरात वाढतील Nails, खा हे 5 प्रोटीनयुक्त फूड्स

Share this article