Chocolate Day 2024 : 'चॉकलेट डे' निमित्त पार्टनरला द्या असे खास सरप्राइज, वाढेल नात्यात मधुरता
व्हॅलेंनटाइन वीकला सुरुवात झाली आहे. 9 फेब्रुवारीला 'चॉकलेट डे' साजरा केला जाणार आहे. या निमित्त पार्टनरला खास सरप्राइज देण्यासाठी पुढील काही आयडियाज नक्कीच तुमच्या कामी येतील.
प्रेमाचा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील ‘व्हॅलेंनटाइन वीक’ ला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (9 फेब्रुवारी) ‘चॉकलेट डे’ साजरा केला जाणार आहे. या निमित्त तुम्हाला पार्टनरला खास सरप्राइज देत आनंदीत करायचे असल्यास पुढील काही आयडिया नक्की वापरू शकता. जेणेकरुन पार्टनर चॉकलेट्सच नव्हे तर गिफ्ट पॅकिंग पाहूनची तुमच्या प्रेमात पडेल.
चॉकलेट बुके
मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची, ब्रॅण्ड्सचे चॉकलेट्स मिळतात. अशातच ‘चॉकलेट डे’ निमित्त तुम्ही पार्टनरला चॉकलेटचा बुके गिफ्ट करू शकता. यामध्ये पार्टनरला आवडणारे चॉकलेट्सही वापरू शकता.
चॉकलेट केक
केक सर्वांनाच आवडतो. पण ‘चॉकलेट डे’ निमित्त तुम्ही पार्टनरला स्वत:च्या हाताने तयार केलेला केक नक्की द्या. या केकवर तुम्ही सुंदर डिझाइन किंवा कॅण्डल्स लावून पार्टनरला ‘चॉकलेट डे’ निमित्त खुश करू शकता.
चॉकलेट बॉक्स
सध्या चॉकलेट्सचे हॅण्डमेड बॉक्स तुम्हाला तयार करून दिले जातात. याशिवाय तुम्ही सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहूनही चॉकलेट्सचा बॉक्स तयार करू शकता. या बॉक्समध्ये तुमच्या मनातील भावना देखील व्यक्त करण्यास विसरू नका.
चॉकलेट बास्केट
नात्यात मधुरता कायम टिकून राहण्यासाठी आणि पार्टनरला ‘चॉकलेट डे’ निमित्त आनंदीत करण्यासाठी तुम्ही चॉकलेट बास्केट देऊ शकता. या बास्केटमध्ये तुम्ही एखादा लहान टेडीसह फुल आणि चॉकलेट्स ठेवू शकता.
चॉकलेट हँगिंग
‘चॉकलेट डे’ निमित्त तुम्हाला काहीतरी हटके सरप्राइज पार्टनरला द्यायचे असल्यास चॉकलेट हँगिंग बेस्ट पर्याय आहे. यासाठी तुम्हाला रिबीनचा वापर करावा लागेल.
मित्रपरिवाराला द्या चॉकलेट्स
चॉकलेट देण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त लागत नाही. नात्यात सदैव प्रेम, आनंद आणि गोडवा टिकून राहण्यासाठी चॉकलेट्स कधीही एकमेकांना भेट म्हणून दिले जाते. यामुळे यंदाच्या ‘चॉकलेट डे’ निमित्त पार्टनरच नव्हे तुमच्या मित्रपरिवाराला देखील चॉकलेट्स नक्की द्या.