Child Health Care : मुलांची चॉकलेट खाण्याची सवय सोडवण्यासाठी उपाय शोधताय? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

लहान मुलांनी जास्त प्रमाणात चॉकलेट खाणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लहान मुलांची चॉकलेट खाण्याची सवय सोडवण्यासाठी जाणून घेऊया उपाय…

 

Harshada Shirsekar | Published : Oct 16, 2023 11:19 AM / Updated: Oct 17 2023, 12:47 PM IST
18
मुलांना शांत करण्यासाठी चॉकलेट देता?

लहान मूल एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करू लागल्यानंतर किंवा रडू लागल्यास (Child Health Care Tips) पालक (Parenting Tips) त्यांना शांत करण्यासाठी चॉकलेट देतात. यामुळे बाळ काही वेळासाठी शांत देखील होते. पण तुम्हीच त्यांना चॉकलेट खाण्याची वाईट सवय लावून देत आहात, हे लक्षात घ्या. काही दिवसांनी मूल चॉकलेट (how much chocolate should a child eat a day) खाण्यासाठीच हट्ट करू लागतात.

(तुम्हालाही सतत थकल्यासारखे जाणवते? मग नियमित करा ही योगासने)

28
मुलांची चॉकलेट खाण्याची सवय कशी सोडवावी?

या सवयीमुळे कालांतराने मूल जेवणच बंद करतात. परिणामी त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतात. तुमचेही मूल चॉकलेट (When Can Child Eat Chocolate?), जंक फूड, वेफर्स, फास्ट फूड यासारखे पदार्थ खाण्यासाठी हट्ट करतात का? त्यांची ही वाईट सवय सोडवण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात, याबाबत आपण माहिती जाणून घेऊया.

38
पालकांनी स्वतःमध्ये करावेत सकारात्मक बदल

मुलांना चांगले वळण लावण्यापूर्वी पालकांनी स्वतःमध्येच काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. कारण तुमचे मूल तुमच्याच प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना चॉकलेट, जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. तसंच पालकांनी स्वतः देखील मुलांसमोर चॉकलेट व आईस्क्रीम खाऊ नये.

(एवढ्याशा काळ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास मिळतील अगणित लाभ)

48
मुलांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा करा समावेश

मुलांच्या आहारामध्ये फळे, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी पौष्टिक खाद्यपदार्थांपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश करावा. जेणेकरून त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा योग्य पद्धतीने विकास होण्यास मदत मिळेल. यासाठी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

(Alia Bhatt Beetroot Salad Recipe : आलिया भटची आवडती बीटरूट सॅलेड रेसिपी जाणून घ्या, वेटलॉससाठी रामबाण उपाय)

58
चॉकलेटमुळे होणारे नुकसान मुलांना सांगा

एखादी गोष्ट मुलांना प्रेमाने समजावून सांगितल्यास त्यांना ते कळते. यानुसार चॉकलेट खाल्ल्यास आरोग्यावर कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबतही त्यांना एखादे चित्र किंवा व्हिडीओच्या माध्यमातून माहिती द्यावी. जेणेकरून मूल चॉकलेट खाण्याचा हट्ट करणार नाही.

68
चॉकलेट खाण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

दात खराब होणे : चॉकलेट खाण्याच्या सवयीमुळे दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे दात किडणे, दात खराब होणे यासारख्या समस्या उद्भवतात. चॉकलेटमध्ये असणाऱ्या साखरेमुळे तोंडामध्ये हानिकारक बॅक्टेरियांची वाढ होण्याची शक्यता असते.

78
रक्तातील साखर वाढणे

जास्त प्रमाणात चॉकलेटचं सेवन केल्याने मुलांच्या रक्तातील शर्करा वाढण्याची भीती असते. यामुळे शरीराचे वजन देखील वाढू शकते. यासह अन्य समस्या उद्भवू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुलांची चॉकलेट खाण्याची सवय वेळीच सोडवण्यासाठी उपाय करावेत.

88
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos