पोषणतत्त्वांची कमतरता
Marathi

पोषणतत्त्वांची कमतरता

खराब लाइफस्टाइल आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे शरीरामध्ये पोषण तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ लागते. परिणामी शरीर कमकुवत होणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्या वाढतात.

थकल्यासारखे वाटणे
Marathi

थकल्यासारखे वाटणे

थोडेसेही काम केल्यानंतर किंवा चालल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असल्यास डाएट आणि वर्कआऊटवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या.

Image credits: Getty
योगासने
Marathi

योगासने

शारीरिक थकवा दूर करण्यासाठी काही आसनांचा नियमित सराव केल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात.

Image credits: Getty
सेतुबंधासन
Marathi

सेतुबंधासन

सेतुबंधासनाचा नियमित सराव केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. यामुळे थकवा जाणवत नाही आणि शरीरात दिवसभर ऊर्जाही टिकून राहते.

Image credits: Getty
Marathi

कसा करावा सराव?

सेतुबंधासनाचा सराव करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा. शरीर सरळ ठेवावे. यानंतर पाय गुडघ्यांमध्ये दुमडून तळवे जमिनीवर ठेवा.

Image credits: Getty
Marathi

क्षमतेनुसार सराव करावा

शक्य असल्यास हातांच्या मदतीने पायाचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करावा अथवा पंजे जमिनीवरच ठेवा. छातीचा भाग वरील बाजूस स्ट्रेच करा व आपल्या क्षमतेनुसार आसनाच्या अंतिम स्थितीत राहावे.

Image credits: Getty
Marathi

सेतुबंधासनाचे फायदे

जबरदस्तीने अंतिम स्थितीमध्ये राहू नका. कारण यामुळे शरीरास कोणतेही लाभ मिळणार नाहीत. या आसनामुळे मूड फ्रेश होण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

बालासन

बालासनाच्या सरावामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यामुळे शारीरिक थकवा दूर होतो. संपूर्ण शरीराला या आसनामुळे फायदे मिळतात.

Image credits: Getty
Marathi

आसनाचा असा करा सराव

मॅटवर वज्रासनात बसा व हातांचे पंजे मांडीवर ठेवा. यानंतर पंजे हळूहळू सरकवत जमिनीवर आणा. असे करत कपाळ जमिनीवर ठेवा. आपल्या क्षमतेनुसार आसनाची अंतिम स्थिती धारण करावी.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

चहा की कॉफी, आरोग्यास सर्वाधिक हानिकारक असलेले पेय कोणते?

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे

एवढ्याशा काळ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास मिळतील अगणित लाभ