रेस्टॉरंटसारखी घरच्याघरी तयार करा Chicken Biryani, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Published : Apr 16, 2025, 04:17 PM IST

Chicken Biryani Recipe : आठवड्यातील नॉन-व्हेजच्या वाराला बहुतांशजण मासे, चिकन यापासून तयार केलेल्या रेसिपी तयार करतात. अशातच घरच्याघरी रेस्टॉरंटसारखी चिकन बिर्याणी कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. 

PREV
16
सामग्री

चिकन मॅरिनेशनसाठी : 

  • 500 ग्रॅम चिकन (साफ केलेले, मध्यम तुकडे)
  • 1 कप दही
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टेबलस्पून लाल तिखट
  • 1/2 टेबलस्पून हळद
  • 1 टेबलस्पून गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 1 टेबलस्पून लिंबाचा रस
  • थोडा कांदा पेस्ट (पर्यायी)


भातासाठी : 

  • 2 कप बासमती तांदूळ
  • 4 कप पाणी
  • 2-3 लवंगा
  • 2 वेलदोडे
  • 1 दालचिनी तुकडा
  • थोडं मीठ
  • 1 टेबलस्पून तेल


बिर्याणीसाठी इतर साहित्य : 

  • 2 मोठे कांदे – पातळ चिरून तळलेले (क्रिस्पी ब्राऊन)
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 2 टोमॅटो (बारीक चिरलेले)
  • 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला
  • 1/2 टेबलस्पून धने पावडर
  • 1/2 कप कोथिंबीर व पुदिना (बारीक चिरलेले)
  • 3 टेबलस्पून तूप/तेल
  • 1/2 कप दूध + १०-१२ केशर धागे
  • थोडं पिवळं रंग पावडर (पर्यायी)
26
चिकन मॅरिनेट करा
  • एका मोठ्या भांड्यात चिकनचे तुकडे घ्या.
  • त्यात दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
  • झाकून किमान 30 मिनिटे (किंवा फ्रिजमध्ये २ तास) मॅरिनेट करून ठेवा.
36
भात उकळून अर्धवट शिजवून घ्या
  • बासमती तांदूळ 30 मिनिटे भिजवून ठेवा.
  • पाण्यात मीठ, मसाले (लवंग, वेलदोडा, दालचिनी) आणि थोडं तेल घालून उकळा.
  • त्यात तांदूळ घालून थोडा शिजवून घ्या (ओव्हरकूक होऊ देऊ नका).
  • लगेच गाळून थंड होऊ द्या.
46
चिकन करी तयार करा
  • कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट परतून घ्या.
  • टोमॅटो, मसाले (धने पावडर, बिर्याणी मसाला) आणि मीठ घालून भाजी चांगली परतून घ्या.
  • मॅरिनेट केलेले चिकन घालून झाकून मध्यम आचेवर 10-15 मिनिटं शिजवा.
  • चिकन अर्धवट शिजल्यानंतर वरून कोथिंबीर, पुदिना व तळलेला कांदा घाला.
56
बिर्याणीची लेयरिंग करा
  • एका मोठ्या भांड्यात थोडं तूप घाला, त्यावर अर्धा भात पसरा.
  • त्यावर अर्धं चिकन मिश्रण, थोडं तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना.
  • पुन्हा भाताची लेयर आणि उरलेलं चिकन घाला.
  • वरून केशर दूध, तूप आणि पिवळ्या रंगाचे काही थेंब शिंपडा.
66
शिजवून घ्या
  • झाकण घट्ट लावा किंवा पीठ लावून बंद करा.
  • 10 मिनिटं मध्यम आचेवर आणि मग १५ मिनिटं अगदी मंद आचेवर ‘दम’वर शिजवा.
  • 10 मिनिटं ठेऊन मग झाकण उघडा आणि गरमागरम खाण्यासाठी कोशिंबीरसोबत सर्व्ह करा.

Recommended Stories