मटण – ५०० ग्रॅम, कांदे – ४ मध्यम, टोमॅटो – २ मध्यम, आले-लसूण पेस्ट – २ टेबलस्पून, गरम मसाला – १ टीस्पून, तिखट – २ टेबलस्पून, हळद – ½ टीस्पून, धने-जिरे पावडर – १ टीस्पून
Image credits: Freepik-mrsiraphol
Marathi
वऱ्हाडी मसाला बनवण्यासाठी
कोरडे खोबरे – ४ टेबलस्पून, कांदा – १ मध्यम, लसूण पाकळ्या – ५, काळी मिरी – ८-१०, दालचिनी – १ तुकडा, लवंग – २, तमालपत्र – १, ओलं खोबरं (ऐच्छिक) – २ टेबलस्पून, सुकी लाल मिरची – २
Image credits: Freepik-timolina
Marathi
चांगलं परतवून घ्या
तेल गरम करून कांदे खरपूस परतून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून परता. आता त्यात हळद, तिखट, धने-जिरे पावडर आणि मीठ घालून चांगलं परतून घ्या.
Image credits: Freepik-mdjaff
Marathi
वऱ्हाडी मसाला मुरून द्या
त्यात वऱ्हाडी मसाला आणि मटण टाका. झाकण ठेवून मटणाला मसाल्याने मुरू द्या.
Image credits: Freepik-azerbaijan_stockers
Marathi
कोथिंबीर घालून जेवण सर्व्ह करा
थोडं पाणी घालून कुकरमध्ये ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. झारून त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी/पोळी/तांदळासोबत सर्व्ह करा.
Image credits: Social Media
Marathi
खास टिप
वऱ्हाडी मटणात झणझणीत चव असते. गरजेनुसार तिखट कमी-जास्त करा. या मटणाबरोबर बाजरीची भाकरी किंवा पातळ भात अप्रतिम लागतो!