Blood Sugar Test : मधुमेह (Diabetes) हा एक दीर्घकालीन आजार असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे अत्यंत गरजेचे असते. पण बरेच जण गोंधळात पडतात की नेमकं दिवसातून किती वेळा ब्लड शुगर तपासावी? याबद्दल सविस्तर वाचा.
टाइप 1 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही, त्यामुळे शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित मोजणी गरजेची असते.
दिवसातून ४ ते ६ वेळा शुगर तपासावी
उठल्यावर उपाशीपोटी
प्रत्येक जेवणाच्या आधी आणि २ तासांनी
झोपण्याआधी
25
टाइप 2 डायबेटिस (गोळ्यांवर किंवा इन्सुलिनवर) असलेल्या व्यक्तींसाठी
इन्सुलिन घेत असाल तर दिवसातून २ ते ४ वेळा तपासणे योग्य
उपाशीपोटी
जेवणानंतर (Postprandial)
कधी कधी झोपण्यापूर्वी
फक्त गोळ्या घेत असाल (oral medication) : -दिवसातून 1-2 वेळा पुरेसे असते -उपाशीपोटी किंवा जेवणानंतर -आठवड्यातून 2-3 वेळा सुद्धा पुरेसे असते, जर शुगर नियंत्रणात असेल
35
ज्येष्ठ नागरिक किंवा नियंत्रित मधुमेह असलेल्यांसाठी
जर शुगर नीट नियंत्रणात असेल आणि डॉक्टरांनी स्पष्ट सूचना दिल्या असतील तर आठवड्यातून 2-3 वेळा तपासणी पुरेशी असते. विशेषतः उपाशीपोटी आणि जेवणानंतर टेस्ट करू शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)